प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रेल्वे (Indian Railway) विशेष काळजी घेत आहे. एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून टॉवेल आणि बेडशीट (BedSheet Stolen) दिले जातात. मात्र, हे बेडशीट चोरल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
लाखो वस्तूंची चोरी
एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून टॉवेल आणि बेडशीट दिले जातात. प्रवासी या वस्तू वापरू शकतात. मात्र काही लोक प्रवास झाल्यानंतर या वस्तू घरी घेऊन जातात. रेल्वेच्या बेडरोलमध्ये (Railway bedrolls) दोन चादरी, एक ब्लँकेट, एक उशी, एक उशीचे कव्हर आणि एक टॉवेल समाविष्ट असतो. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2017-18 मध्ये 1.95 लाख टॉवेल, 81,776 बेडशीट, 5,038 पिलो कव्हर आणि 7,043 ब्लँकेट चोरीला गेले. तसेच दरवर्षी मोठ्या प्रमाणात बेडरोलच्या वस्तूंची चोरी होते. या वस्तूची किंमत सुमारे 14 कोटी रुपये असल्याचे समजते.
होऊ शकतो एक हजार रुपयांचा दंड
यावर उपाय म्हणून रेल्वेतून बेडशीट आणि टॉवेल चोरणाऱ्यांना दंड केला जाणार आहे. ट्रेनच्या बाहेर पडल्यानंतर प्रवाशांकडे बेडरोलचे साहित्य आढळले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
होऊ शकते एक वर्षाची शिक्षा
रेल्वेचा टॉवेल (Towel) आणि बेडशीट घरी घेऊन जातांना कोणी पकडले, तर त्या प्रवाशाविरुद्ध कारवाई होऊ शकते. वास्तविक, ही रेल्वेची मालमत्ता मानली जाते आणि रेल्वे मालमत्ता कायदा 1966 (Railway Property Act) अंतर्गत ट्रेनमधून माल चोरीच्या विरोधात कारवाई करण्याची तरतूद आहे. अशा प्रकरणात या गुन्ह्यासाठी एक वर्षाची शिक्षा होऊ शकते. एक हजार रुपये दंडही होऊ शकतो. तुरुंगवासाची शिक्षा 5 वर्षांपर्यंत वाढू शकते. (Indian Railway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community