पश्चिम रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेंतर्गत गेल्या सहा महिन्यांत भंगार विक्रीतून 150 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. भारतीय रेल्वेने 10 ऑगस्टपर्यंत 200 कोटी रुपये महसूल गोळा केला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, सर्व विभाग आणि विविध डेपोंवर भंगारविक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे.
पश्चिम रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या 6 महिन्यांत भंगार विक्रीतून 150 कोटींपेक्षा जास्त कमाई झाली आहे. भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वे हा चालू वर्षात 6 महिन्यांच्या कालावधीतील 150 कोटी रुपये महसूल गोळा करणारा पहिला झोन ठरला आहे. पश्चिम रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी पश्चिम रेल्वेने शून्य भंगार मोहिम सुरु केली आहे.
( हेही वाचा: युवकांमधील कौशल्य विकासाद्वारे रोजगार वाढीस प्राधान्य – मुख्यमंत्री )
स्वच्छतेचा नारा
भंगाराची विल्हेवाट लावून पश्चिम रेल्वे केवळ महसूलच गोळा करत आहे असे नव्हे तर त्यामुळे रेल्वेचा मोठा परिसर स्वच्छ होणार आहे. तसेच ही जागा दुस-या चांगल्या उपक्रमासाठीदेखील वापरता येणार आहे. या योजनेमुळे परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे.
Join Our WhatsApp Community