देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये कोरोना नियम शिथिल करण्यात आले आहेत. पण आता याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क वापरण्याची सक्ती नसली तरी प्रवाशांनी खबरदारीच्या दृष्टीकोनातून मास्क वापरण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने या सूचना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी सर्व झोनच्या चीफल कमर्शियल मॅनेजर्सना पत्र पाठवून या संदर्भात सूचना दिल्या आहेत. रेल्वे प्रवासात मास्क वापरणे सक्तीचे असून, कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही या पत्रातून देण्यात आल्य आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबत 22 मार्च रोजी जारी केलेल्या एसओपीचे पालन करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाकडून देशभरातील सर्व रेल्वे झोनना देण्यात आले आहेत.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय
कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी झाल्यानंतर प्रवासादरम्यान करण्यात आलेली मास्क सक्ती रेल्वे प्रशासनाकडून शिथिल करण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community