ट्रेनच्या पुढच्या आणि शेवटच्या डब्यात मोटरमन आणि गार्ड असतात. यांच्याशिवाय ट्रेन कधी धावू शकत नाही. पण आता रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ट्रेनमधील गार्ड नावाची व्यक्ती आपल्याला दिसणार नाही. कारण या गार्डचं नाव आता रेल्वे प्रशासनाकडून बदलण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाचा निर्णय
रेल्वे कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. ट्रेनच्या गार्डना ट्रेन मॅनेजर असं नाव देण्याची मागणी करण्यात येत होती. त्याला आता रेल्वे प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे आता ट्रेनच्या गार्डना गार्डऐवजी ट्रेन मॅनेजर असे संबोधण्यात येणार आहे.
जबाबदारीत कोणताही बदल नाही
ट्रेनच्या गार्डवर फार मोठी जबाबदारी असते. प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच इतरही अनेक जबाबदाऱ्या गार्डना पार पाडाव्या लागतात. त्यामुळे गार्ड हे पदनाम बदलावे अशी मागणी 2004 पासून कर्मचा-यांकडून करण्यात येत होती. पण पदनाम बदलले असले तरी त्यांच्या जबाबदाऱ्या या पूर्वीप्रमाणेच असणार आहेत.
अशी असतील पदनामे
- असिस्टंट गार्ड- असिस्टंट पॅसेंजर ट्रेन मॅनेजर
- गुड्स गार्ड- गुड्स ट्रेन मॅनेजर
- सिनियर गुड्स गार्ड- सिनियर गुड्स मॅनेजर
- सिनियर पॅसेंजर गार्ड- सिनियर पॅसेंजर ट्रेन मॅनेजर
- मेल/ एक्सप्रेस गार्ड- मेल/ एक्सप्रेस ट्रेन मॅनेजर