एकाच तिकिटावर करा दोनदा प्रवास! भारतीय रेल्वेचा ‘ब्रेक द जर्नी’ नियम काय सांगतो?

भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभरात पसरले असल्याने अनेकदा आपल्याला लांबच्या प्रवासासाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी सुद्धा लागतो, यामुळे बऱ्याचवेळा प्रवाशांची सुद्धा गैरसोय होते. यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी भन्नाट सुविधा आणली आहे. लांबच्या प्रवासात प्रवासी ‘ब्रेक द जर्नी’ ( Break The Journey) या पर्यायाचा वापर करू शकतात. हा नियम नेमका काय आहे जाणून घेऊयात…

( हेही वाचा : मालिका जिंकल्यावर विराट-ईशान थिरकले; डान्सचा व्हिडिओ व्हायरल!)

प्रवासादरम्यान नागरिक त्यांचा प्रवास मध्येच थांबवू शकतात. या सुविधेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ज्या स्टेशनवर तुम्ही उतराल त्या ठिकाणावरून तुमचा प्रवास तुम्ही पुन्हा सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला नवे तिकीट खरेदी करण्याची गरज नाही.

‘ब्रेक द जर्नी’ ( Break The Journey) नियम काय?

रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार प्रवाशांना लांबच्या प्रवासासाठी या सुविधेचा फायदा घेता येणार आहे. लांबच्या प्रवासादरम्यान रेल्वे स्टेशनवर उतरण्यास आणि दोन दिवसांच्या आतमध्ये पुन्हा प्रवास सुरू करण्यास रेल्वेकडून मान्यता देण्यात आली आहे. परंतु यासाठी काही नियम आहेत.

उदाहरणार्थ जर एखाद्या प्रवाशाचे तिकीट आरक्षण हे ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचे असेल तर तो प्रवासी एक स्टेशनवर उतरून दोन दिवसांसाठी विश्रांती घेऊन पुढील प्रवास त्याच तिकिटावर करू शकतो. मात्र या सुविधेसाठी प्रवासाच्या सुरूवातीपासून ५०० किलोमीटरचे अंतर पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.

नियम –

  • प्रवासी ५०० किलोमीटर पूर्ण झाल्यावरच ब्रेक द जर्नी या पर्यायाचा वापर करू शकतात.
  • १ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करायचा असेल तर रेल्वे एकवेळा प्रवास थांबवण्याची मुभा देते. संबंधित प्रवासी अनुक्रमे ४०० व ८०० किलोमीटर पूर्ण झाल्यावर प्रवास ब्रेक करून दोन दिवसांच्या आता आपला प्रवास पुन्हा सुरू करू शकतात.
  • जर एखाद्या प्रवाशाला २ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करायचा असेल, तर संबंधित प्रवासी २ वेळा आपला प्रवास ब्रेक करून पुन्हा सुरू करू शकतात. प्रवासी अनुक्रमे ८००, ९०० आणि १५०५ किलोमीटरनंतर जर्नी ब्रेक करून दोन दिवसांच्या आता आपला प्रवास पुन्हा सुरू करू शकतात.
  • फक्त लक्षात ठेवा प्रवाशांनी जर ब्रेक द जर्नी या नियमांअंतर्गत प्रवास थांबवला तर पुढील प्रवास २ दिवसांच्या आत सुरू करणे बंधनकारक आहे.

सुविधेचा लाभ कसा घ्याल?

रेल्वेच्या नव्या नियमांप्रमाणे प्रवाशांना प्रवास करायचा असेल तर यासाठी तुम्हाला याची माहिती रेल्वे स्टेशन व्यवस्थापक आणि तिकीट कलेक्टरला देणे आवश्यक आहे. रेल्वे नियमांनुसार प्रवाशांना आपला प्रवास थांबवण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु याची माहिती संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना देणेही तेवढेच गरजेचे आहे यामुळे प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here