थंडी आणि धुक्यामुळे देशातील रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. भारतीय रेल्वेने शुक्रवारी, 28 जानेवारी रोजी 498 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. थंडीची लाट वाढल्याने भारतीय रेल्वेकडून गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या जिल्ह्यातील ट्रेन रद्द
रेल्वेकडून शुक्रवारी रद्द झालेल्या गाड्यांव्यतिरिक्त, 26 गाड्यांची सुरुवातीची स्थानके बदलण्यात आली, तर खराब हवामानामुळे इतर 32 गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, आसाम, हिमाचल प्रदेश, नवी दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, गुजरात, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेश दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन तपशील हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी 27 जानेवारी रोजी किमान 529 आणि 26 जानेवारी रोजी 1267 गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
(हेही वाचा गणवेषाऐवजी मला बुरखा घालू द्या! मुस्लिम विद्यार्थीनीच्या मागणीला चपराक)
पुढील तीन दिवस थंडीची लाट
भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सांगितले की, येत्या तीन दिवसांत उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य आणि लगतच्या पूर्व भारतावर थंडीची लाट कायम राहील. तसेच अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. यापूर्वी 27 जानेवारी रोजी तब्बल 529 आणि 26 जानेवारी रोजी 1267 गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. उत्तर रेल्वेच्या म्हणण्यानुसार, धुक्यामुळे दृश्यमानताही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. यापूर्वी 15 जानेवारीलाही रेल्वेने गाड्या रद्द केल्या होत्या.
Join Our WhatsApp Community