रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मोठा निर्णय घेत पुढील विशेष गाड्यांची मुदत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांनी रेल्वे प्रवास करणारा दिलासा मिळणार आहे.
(हेही वाचा – Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! ‘या’ एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांना मिळणार FREE नाश्ता-जेवण!)
- ट्रेन क्र. 01025 दादर-बलिया त्रि-साप्ताहिक विशेष 14.12.2022 पर्यंत चालविण्यासाठीची अधिसूचित आता 30.12.2022 पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
- ट्रेन क्रमांक 01026 बलिया-दादर त्रि-साप्ताहिक चालविण्यासाठीची अधिसूचित 16.12.2022 पर्यंत आता 01.01.2023 पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
- ट्रेन क्रमांक 01027 दादर-गोरखपूर आठवड्यातून 4 दिवस 15.12.2022 पर्यंत चालविण्यासाठीची अधिसूचित आता 31.12.2022 पर्यंत चालविण्यासाठी वाढवण्यात आली आहे.
- ट्रेन क्र. 01128 गोरखपूर-दादर आठवड्यातून 4 दिवस 17.12.2022 पर्यंत चालविण्यासाठीची अधिसूचित आता 02.01.20230पर्यंत चालविण्यासाठी वाढवण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व विशेष गाड्यांच्या वेळा, रचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
असे करता येणार आरक्षण
दादर येथून सुटणाऱ्या विशेष गाडी क्रमांक 01025/01027 विस्तारित गाड्यांचे बुकिंग 13.12.2022 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे.
Join Our WhatsApp Community