राजधानी एक्स्प्रेसच्या कॅटरिंग व्यवस्थापनेच्या निष्काळजीपणामुळे धक्कादायक प्रकार घडला आहे. कॅटरिंग विभागाच्या चुकीमुळे अन्नात झुरळ आढळले यामुळे सोशल मिडियावर सर्व युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.
( हेही वाचा : फिफा विश्वचषक जिंकल्यावर मेस्सीने निवृत्तीचा निर्णय बदलला… )
राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने आपल्या मुलीसाठी ऑम्लेट ऑर्डर केले होते. या ऑम्लेटमध्ये संबंधित प्रवाशाला झुरळ आढळले. या प्रकारानंतर या प्रवाशाने ट्वीट करत रेल्वे मंत्रालयाला टॅग करत घडलेल्या प्रकाराची जबाबदारी कोण घेणार असा सवाल केला आहे.
ऑम्लेटमध्ये आढळले झुरळ
मुलीच्या ऑम्लेटमध्ये झुरळ आढळल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला. यानंतर मुलीचे वडील योगेश मोरे यांनी ऑम्लेटचा फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. १६ डिसेंबरला राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करताना माझ्या मुलीसाठी आम्ही ऑम्लेट ऑर्डर केले बोते. त्यात आम्हाला झुरळ आढळले. माझी मुलगी २.५ वर्षांची आहे तिला जर काही झालं तर याची जबाबदारी कोण घेणार असे ट्वीटमध्ये नमूद करत या प्रवाशाने रेल्वे मंत्रालय, पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे.
योगेश मोरे यांनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये झुरळ स्पष्टपणे दिसत आहे. यावर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया आहे. दरम्यान यावर आता रेल्वे प्रशासन आणि IRCTC या घटनेवर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे गरजेचे आहे. सोशल मिडियावर सर्वत्र योगेश मोरे यांचे ट्वीट व्हायरल होत आहे.
Join Our WhatsApp Community16dec2022,We travel from Delhi by (22222). In morning, we ordered extra omlate for baby. See attach photo of what we found! a cockroach? My daughter 2.5 years old if something happened so who will take the responsibilities @PMOIndia @PiyushGoyal @PiyushGoyalOffc @RailMinIndia pic.twitter.com/X6Ac6gNAEi
— Yogesh More – designer (@the_yogeshmore) December 17, 2022