Indian Railway च्या विद्युतीकरणाला १०० वर्षे पूर्ण; कसा होता प्रवास, जाणून घ्या..

68

मुंबईची लाइफलाइन (Mumbai Lifeline) अशी ओळख असणाऱ्या लोकल ट्रेनला (Local train) सोमवारी ३ फेब्रुवारीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. भारतातली पहिली इलेक्ट्रिक रेल्वे (first electric railway) ३ फेब्रुवारी १९२५ ला धावली होती. व्हिक्टोरिया टर्मिनस (सीएसएमटी) ते कुर्ला हे १६ किमी अंतर पार केलं होतं. चार लाकडी डबे ते एसी लोकल असा मुंबई लोकलचा प्रवास १०० वर्षांचा (100 years of journey of Mumbai local) झालाय. या निमित्ताने मध्य रेल्वेनं (Central Railway)  खास लोगोचं अनावरणही करण्यात आलं आहे. (Indian Railway)

केवळ भारतच नाही तर आशियातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन
100 वर्षांपूर्वी 3 फेब्रुवारी 1925 रोजी भारतात पहिली इलेक्ट्रिक ट्रेन धावली होती. ही केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन होती. ही ट्रेन बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनल म्हणजेच आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कुर्ला हार्बर दरम्यान चालवली जात होती. या ट्रेनचे 1500 व्होल्ट डीसी (डायरेक्ट करंट) वर विद्युतीकरण करण्यात आले होते.

ट्रेनला हिरवा झेंडा कोणी दाखवला?
या ट्रेनला बॉम्बे प्रेसिडेन्सीचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली विल्सन (Governor Sir Leslie Wilson) यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. हार्बर मार्गावर धावणाऱ्या या गाडीला मोटार कोच आणि ट्रेलर कोच असे एकूण चार डबे होते. ही इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट्स किंवा EMU ट्रेन होती.

(हेही वाचा –MMRDA च्या प्रकल्पांसाठी १२०० कोटींच्या निधीचा मार्ग मोकळा; कर्जासाठी राज्य सरकारची हमी)

भारतात पहिली ट्रेन कधी धावली?
भारतातील पहिली ट्रेन १८३७ मध्ये धावली. त्यानंतर 25 किलोमीटरचे अंतर कापले होते. ही रेल्वे सर आर्थर कॉटन यांनी बांधली होती. ग्रॅनाइट दगड वाहतुकीसाठी वापरला जात असे. भारतात प्रवास करण्यासाठी पहिली ट्रेन 1853 मध्ये धावली. ही ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान बोरीबंदर दरम्यान धावली. या ट्रेनमध्ये एकूण 20 डबे होते, ज्यांना ओढण्यासाठी एकूण तीन इंजिन जोडण्यात आले होते. ही वाफेची इंजिने होती जी कोळसा इंधन म्हणून वापरत. त्यावेळी परदेशातूनही कोळसा यायचा. या पहिल्या ट्रेनमधून सुमारे 400 लोकांनी प्रवास केला.

(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators : मुंबई पोलिसांच्या रडारवर हॉटेल व्यावसायिक, लेबर कंत्राटदार आणि विकासक)

विद्युतीकरणाचे फायदे
सध्याच्या घडीला विद्युतीकरणामुळं भारतीय रेल्वेला अनेक फायदे झाले आहेत. डिझेल इंजिनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक इंजिन स्वच्छ आणि कमी प्रदूषणकारी आहेत. त्यामुळं कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात घटलंय. वीज वापर 30 टक्के अधिक किफायतशीर ठरलाय. यातून रेल्वेचा वेग आणि सतत धावण्याची क्षमता वाढली आहे. आता भारतीय रेल्वेनं 2026 पर्यंत संपूर्ण देशभरातील रेल्वेमार्ग पूर्णतः विद्युतीकरण करण्याचा संकल्प केलाय. यासोबतच, भारतीय रेल्वे हरित ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जेच्या वापरावर अधिक भर देत आहे. सौर आणि पवन ऊर्जेचा वापर अधिकाधिक करून वंदे भारत आणि बुलेट ट्रेनसारख्या (Bullet train) हायस्पीड रेल्वेगाड्यांसाठी स्वच्छ ऊर्जा प्रणाली विकसित केली जात आहे. तसंच, रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जेच्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जात असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.