नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात काश्मीरमध्ये रेल्वेने (Indian Railway New Coach) प्रवास करणे आणखी आरामदायी होणार आहे. जानेवारी महिन्यात दोन नवीन रेल्वे गाड्या सुरू करणार आहेत. या दोन्ही ट्रेनमध्ये प्रवाशांना सुसज्ज सुविधा मिळणार आहेत. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात काश्मीरमधील बहुतांश भागात तापमान उणेपर्यंत पोहोचते. त्यामुळे याठिकाणी थंडीची मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट पसररते. अशा स्थितीत प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन रेल्वेने नवीन डब्यांची डिझाइन केली आहे. (Indian Railway Heated Coach)
भारतीय रेल्वेने पहिली ट्रेन नवी दिल्ली ते श्रीनगरपर्यंत (Train New Delhi to Srinagar) धावणार आहे. त्यामुळे दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या प्रवाशांना जम्मूहून ट्रेन बदलावी लागणार नाही. नवीन ट्रेन ही सेंट्रली हीटेड स्लीपर ट्रेन (heated sleeper train) आहे. म्हणजेच या ट्रेनमध्ये प्रवाशांना गरम हवा मिळणार आहे. ही ट्रेन दिल्ली ते श्रीनगर हे अंतर १३ तासांत पूर्ण करेल. ही ट्रेन ३५९ मीटर उंच चिनाब पूल ओलांडणार आहे. तसेच यात सेकंड क्लास स्लीपरची सुविधा नसेल.
(हेही वाचा – Congress CWC Meeting : काँग्रेसच्या पोस्टरवर भारताच्या नकाशातून पीओके गायब; काश्मीरशी पुन्हा केला द्रोह )
दुसरी ट्रेन कशी असेल?
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत ही दुसरी ट्रेन आठ डब्यांची आहे. त्यात खुर्ची कार बसण्याची व्यवस्था आहे. ही ट्रेन कटरा-बारामुल्ला (Katra-Baramulla train) दरम्यान धावणार आहे. कटरा ते बारामुल्ला दरम्यानचा २४६ किलोमीटरचा प्रवास केवळ साडेतीन तासांत पूर्ण होईल, तर बसने १० तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
या ट्रेनमध्ये विशेष सुविधांचाही समावेश आहे. त्यात पाण्याच्या टाक्यांसाठी सिलिकॉन हीटिंग पॅड असेल जे थंडीपासून संरक्षण करेल. अशा परिस्थितीत प्रवाशांना ट्रेनमध्ये गरम पाणी मिळणार आहे. या ट्रेनच्या टॉयलेटसाठी डक्ट खास डिझाईन करण्यात आला आहे ज्यामुळे त्यात गरम हवा येत राहील.
(हेही वाचा – Thane येथे देशातील पहिली दिव्यांगांसाठीची ‘सुगम्य सिग्नल यंत्रणा’ कार्यरत)