मुंबई-बल्हारशाह विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

140

मुंबई-बल्हारशाह यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता आनंदाची बातमी आहे. कारण रेल्वेकडून मुंबई-बल्हारशाह या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मुंबई ते बल्हारशाह दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी पुढीलप्रमाणे वाढवीत आहे:

  • 01127 लोकमान्य टिळक टर्मिनस- बल्हारशाह विशेष आता दि. २.८.२०२२ आणि ९.८.२०२२ (२ फेऱ्या) रोजी धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
  • 01128 बल्हारशाह – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष आता दि. ३.८.२०२२ आणि १०.८.२०२२ (२ फेऱ्या) रोजी चालवण्यासाठी वाढवण्यात आली आहे.

(हेही वाचा – Indian Railway Concession: रेल्वे प्रवास होणार स्वस्त आणि सुखकर! रेल्वे मंत्रालयाने म्हटले….)

या विशेष ट्रेनच्या वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 01127/01128 च्या विस्तारित फेऱ्यां साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २७.७.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.