आतापर्यंत ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी आयआरसीटीसी ॲपची (New Application) मदत घेतली जात होती आणि ट्रेनच लोकेशन जाणून घेण्यासाठी नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम ॲपची मदत घ्यावी लागते. तसेच तक्रारीसाठी १३९ नंबर डायल करावा लागायचा. अशा किचकट परिस्थितीमुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होते, अशा स्थितीत रेल्वेच्या सुपर ॲपद्वारे या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. (Indian Railway)
(हेही वाचा-Jammu & Kashmir : कलम ३७० वरुन जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा राडा!)
प्रवाशांच्या सेवेसाठी भारतीय रेल्वेने एक सुपर ॲप लाँच करण्याची घेषणा केली आहे. ज्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचेल. त्याचबरोबर, रेल्वे प्रवास आणखी सुलभ, सोपा होईल. या ॲपच्या मदतीने, रेल्वेच्या विविध सेवा प्रवाशांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. (Indian Railway)
(हेही वाचा-Delhi Air Pollution: दिल्लीतील AQI 367 च्या वर; यमुनेच्या काठावर छठपूजेस बंदी, त्वचाविकाराचा धोका वाढला)
आजवर तिकीट काढण्यासाठी, जेवणासाठी अशा अनेक गोष्टींसाठी वेगवेगळ्या ॲपचा, प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागत असे. पण आता असे होणार नाही. आता या रेल्वेच्या सुपर ॲपद्वारे, सर्व सोई-सुविधांचा एकाच ठिकाणी लाभ घेता येणार आहे. या ॲपच्या मदतीने विविध रेल्वे सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळवण्यासाठी याच ॲपद्वारे प्रवाशांना नोंदणी करून सेवांचा लाभ घेता येईल. (Indian Railway)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community