रेल्वे प्रवास करताना मिळणार कन्फर्म तिकीट! IRCTC ने सांगितला ‘हा’ मार्ग

191

भारतीय रेल्वेचा प्रवासीवर्ग सर्वाधिक आहे. प्रामुख्याने सण, लागोपाठ सुट्ट्या आल्या की, चाकरमानी गावची वाट धरतात. आताही सणासुदीचा हंगाम असल्यामुळे बहुतांश लोक बाहेर जाण्याचे बेत आखत आहे. अशावेळी गाड्यांमध्ये गर्दी होऊन कन्फर्म तिकीट मिळणे अवघड होते. परंतु भारतीय रेल्वेने आणलेल्या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना आता क्षणार्धात कन्फर्म तिकीट मिळणार आहे.

आयआरसीटीसीने प्रवाशांच्या सोयीसाठी ‘कन्फर्म तिकीट’ हे अ‍ॅप आणले आहे. या अ‍ॅपद्वारे रेल्वे प्रवाशांना घरबसल्या तत्काळ कन्फर्म तिकीट बुक करता येणार आहे. हे अ‍ॅप आयआरसीटीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

( हेही वाचा : मध्य रेल्वे ‘अशी’ होतेय मालामाल! )

‘कन्फर्म तिकीट’ अ‍ॅपचे फायदे

  • रेल्वेने लॉंच केलेल्या या नव्या अ‍ॅपवर तुम्हाला तत्काळ कोट्यात उपलब्ध असलेल्या जागांची माहिती मिळणार आहे तसेच तुम्ही रेल्वेचे क्रमांक टाकून विनाआरक्षित जागांची माहिती प्रवासी घेऊ शकता.
  • हे अ‍ॅप तुम्ही प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. या अ‍ॅपममध्ये तिकीट बुकींगसाठी मास्टर लिस्ट आहे, यामुळे तिकीट बुकिंगसाठी तुमचा वेळ वाया जाणार नाही
  • या अ‍ॅपवर प्रवासी सकाळी १० वाजल्यापासून तत्काळ तिकीट बुक करू शकतात.
  • या अ‍ॅपमुळे प्रवाशांना घरबसल्या कन्फर्म तिकीट मिळणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.