Indian Railway : आता क्रमांक नाही, नावाने ओळखले जातील प्लॅटफॉर्म; भारतीय रेल्वेची नवी सुविधा

रेल्वेचे सगळे प्लॅटफॉर्म क्रमांकाने ओळखले जातात. उदा. गाडीची माहिती देताना, या क्रमांकाच्या फलाटावर ट्रेन थांबेल अशी माहिती देण्यात येते. परंतु क्रमांकाने ओळखले जाणारे रेल्वे प्लॅटफॉर्म आता नावाने ओळखले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

( हेही वाचा : बेस्टच्या ताफ्यात येणार नव्या बस; पण कर्मचारी वर्गात नाराजी काय आहे कारण?)

प्लॅटफॉर्म ओळखले जाणार नावाने

भारतीय रेल्वे आणि बीएल अ‍ॅग्रो (BLAgro) यांच्यातील करारानुसार नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील काही प्लॅटफॉर्मना कंपनीच्या बुल क्रशर आणि नॉरिश या ऑइल ब्रॅंडच्या नावाने नाव दिले जाणार आहे. प्रवासासाठी निघाल्यावर प्रवाशांना सुरूवातीला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण दिल्लीत रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांकाने ओळखण्याची पद्धती यापुढे नसणार आहे. भारतीय रेल्वेच्यावतीने उत्तर प्रदेशमध्ये दैनंदिन वापरातील उत्पादने बनवणाऱ्या बीएल अ‍ॅग्रोला प्लॅटफॉर्मचे नाव बदलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील काही प्लॅटफॉर्मला कंपनीच्या बुल क्रशर आणि न्युरिश या ऑइल ब्रॅंडच्या नावावर नावे दिली जातील. या करारामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ चे नाव नॉरिश प्लॅटफॉर्म असे तर अजमेरी गेटच्या बाजूला अससेला प्लॅटफॉर्म १६ हा ‘बुल क्रशर प्लॅटफॉर्म १६’ म्हणून ओळखला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here