मध्य रेल्वेने सेवा सुधारणेसाठी अनेक पावले उचलली आहेत, पायाभूत सुविधा मजबूत केल्या आहेत आणि ग्राहक आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. सर्वसाधारणपणे पायाभूत सुविधांची कामे सुधारण्यावर आणि कोविड-19 विरुद्ध लढा आणि विशेषतः प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यावर या वर्षी लक्ष केंद्रित करण्यात आले. कोविड-19 महामारीमुळे, सेवा हळूहळू पुन्हा सुरू झाल्या आणि सध्या मुंबई विभागात सर्व उपनगरीय सेवा सुरू आहेत आणि लांब पल्ल्याच्या गाड्या जवळजवळ कोविड-पूर्व स्तरावर चालविण्यात येत आहेत.
माल व पार्सल वाहतूक कामगिरी
- मध्य रेल्वे डिसेंबर 2021 मध्ये सर्वोत्तम मालवाहतूक साध्य करेल अशी शक्यता आहे. डिसेंबर 2021 मध्ये आतापर्यंत 6 दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे.
- वर्ष 2021 मध्ये जानेवारी ते डिसेंबर (आजपर्यंत) किसान रेलच्या 770 ट्रिप धावल्या तर किसान रेलची सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण 886 ट्रिप चालवण्यात आल्या आहेत.
व्हिजन २०२२
- नेरळ – माथेरान टॉय ट्रेनच्या पायाभूत सुविधांचे अपग्रेडेशन
- अधिक पादचारी पूल, लिफ्ट आणि एस्केलेटरची सोय
- अधिक एसी लोकल सेवाना सुरुवात
- डेक्कन क्वीन एक्सप्रेस नवीन एलएचबी रेकसह धावणार
- जेजुरी – शेणोली (158 RKM), कुर्डुवाडी – लातूर (190 RKM), मोहोळ – दुधनी (91 RKM) आणि लोणंद – फलटण (26 RKM) या विभागांचे विद्युतीकरण नवीन वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य.
(हेही वाचा सैन्य दल आता सायबर युद्धाच्या विरोधात लढण्यास होणार सज्ज)
मध्य रेल्वेचे वर्ष 2021 मधील काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे
उपनगरीय सेवा
- 44 अंधेरी पर्यंतच्या सेवांचा गोरेगावपर्यंत विस्तार ( आता अंधेरीपासूनच्या सर्व सेवा गोरेगावपर्यंत विस्तारित)
- चौथ्या कॉरिडॉरवर सकाळच्या पीक अवर सेवांमध्ये वाढ
- हार्बर मार्गावर 12 वातानुकुलीत लोकल सेवांना सुरुवात
लांब पल्ल्यांच्या सेवा
- चाळीसगाव – धुळे विभागावर मेमू सेवांना प्रारंभ
- 2021 मध्ये 12 रेक (6 ट्रेनचे) एलएचबी रेकमध्ये रूपांतरित केले.
- 1054 फेऱ्यासाठी 166 अतिरिक्त डबे (वातानुकुलीत 3 टियर, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास) विविध गाड्यांना जोडले गेले आहेत.
- उन्हाळ्याच्या सुट्ट्या, सणाच्या सुट्ट्या दरम्यान विविध प्रसंगी 1742 विशेष गाड्या धावल्या.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात आला आणि ग्वाल्हेर येथे अतिरिक्त थांब्याची तरतूद; शिवाय दिनांक 19.1.2021 पासून दररोज धावत आहे
- यूटीएस मोबाइल अॅप- सीझन तिकीट/प्रवास तिकीट जारी करण्यासाठी राज्य सरकारच्या पोर्टलशी जोडलेले आहे ज्याद्वारे युनिव्हर्सल पास जारी करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस मिळालेल्या व दुसरा डोस दिल्यानंतर 14 दिवसांचा कालावधी संपला आहे अशा व्यक्तीची पुष्टी होते.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नवीन थीम-आधारित रंगीत फलक
- कोपर आणि अंबरनाथ स्थानकावर नवीन होम प्लॅटफॉर्म
- पादचारी पूल (एफओबी) – 2021 या वर्षात 13 एफओबी प्रदान करण्यात आले
- मध्य रेल्वेवरील एकूण पादचारी पुलांची संख्या आता 319.
- मध्य रेल्वेवरील एकूण एस्केलेटरची संख्या 125.
- एस्केलेटर- मुंबई विभागात 5 दुहेरी एस्केलेटर प्रदान
- मध्य रेल्वेवरील एकूण लिफ्ट्सची संख्या 86.
- वाय-फाय – वाय-फाय सुविधेमध्ये मध्य रेल्वेवरील आता ३७९ स्थानके समाविष्ट आहेत.
- गुरु तेग बहादूर नगर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन शौचालये
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दृष्टिहीनांसाठी ब्रेल स्पर्श नकाशा
- मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस आणि पुणे-मुंबई डेक्कन क्वीनमध्ये विस्टाडोम कोच
- पुणे येथे हडपसर टर्मिनल सुरू झाले
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक्झिक्युटिव्ह वेटिंग लाउंज
- स्थानकांवरील सामान्य माहितीसाठी यात्री अॅप
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे डिजिटल क्लोक रूम
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेस्टॉरंट ऑन व्हीलची सुरुवात. मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी आणि मध्य रेल्वेच्या इतर विभागातील नागपूर, आकुर्डी, बारामती, चिंचवड आणि मिरज स्थानकावर अशा प्रकारची सेवा प्रदान करण्यासाठी प्रायोजित
- आत्तापर्यंत मुंबई विभागातील 3450 स्थानकांसह मध्य रेल्वेवर एकूण 4687 सीसीटीव्ही कॅमेरे प्रदान करण्यात आले.
- 37 लोकल गाड्यांच्या 200 महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत
- उपनगरीय महिला प्रवाशांसाठी स्मार्ट सहेली अॅप
- एकट्याने प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्याच्या महिला प्रवाशांसाठी मेरी सहेली अॅप
- रेल्वे पूर मदत पथक पाण्यावर चालवता येण्याजोग्या मोटार बोटीसह मोक्याच्या ठिकाणी स्थापित
- कल्याण येथे नवीन रोड ओव्हर ब्रिज बांधण्यात आला
- हँकॉक रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डर्स लाँच करण्यात आले
- मस्जिद आणि सँडहर्स्ट रोड येथे सूक्ष्म-बोगदा पद्धतीने पाण्याचा निचरा होण्यासाठी जलमार्ग वाढवण्यात आले
- दुधनी – होटगी विद्युतीकरण (22.6.2021 रोजी कार्यान्वित)
- वाशिंबे – भालवणी विद्युतीकरण (27.10.2021 रोजी 26.33 किमी कार्यान्वित)
- ढालगाव – कुर्डुवाडी विद्युतीकरण (136 TKM)
- शेणोली – मिरज विद्युतीकरण (101 TKM)
- ताकारी – किर्लोस्करवाडी दुहेरीकरण (9.7.2021 रोजी कार्यान्वित),
- आंबळे – राजेवाडी विभागाचे दुहेरीकरण (20.6.2021 रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्त तपासणी पूर्ण)
- जळगाव – भादली 11.51 कि.मी (भुसावळ – जळगाव तिसऱ्या लाईनचा भाग)