रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. मोठ्या स्थानकांचे वाढलेले प्लॅटफाॅर्म तिकीट दर कमी केले आहेत. अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी फलाट तिकीटांचा दर वाढवला होता, चा विभागीय रेल्वे मॅनेजराचा अधिकार रेल्वे बोर्डाने काढला.
रेल्वेने मुंबईत रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकीट दरात वाढ केली होती. अनेक स्टेशनवप तिकीट दर दहा रुपयांवरुन 30 ते 50 रुपये केले होते. या निर्णयाला प्रवाशांनी विरोध केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला. प्लॅटफाॅर्मवरील अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी 2015 साली रेल्वे मॅनेजरकडे रेल्वे प्रशासनाने हे अधिकार दिले होते.
( हेही वाचा: Virat Kohli Birthday : विराट कोहली आणि 18 क्रमांकाचे आहे भावनिक कनेक्शन! )
‘हे’ होते एक प्रमुख कारण
रेल्वेच्या या नव्या निर्णयामुळे आता डीआरएमला प्लॅटफाॅर्म तिकिटांच्या किंमती वाढवता येणार नाहीत. यामुळे लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्लॅटफाॅर्म तिकीट दरवाढीमुळे स्टेशनवर उगाचच येणा-यांची संख्या घटेल, असा विश्वास रेल्वेला होता. यामुळे सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांवर 50 रुपये दर केले होते. प्लॅटफाॅर्म तिकीटाच्या दरात वाढ करण्यामागे विशेष कारण चेन पुलिंगच्या घटनादेखील होत्या. एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या घटना घडल्या होत्या.
Join Our WhatsApp Community