महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेकडून विशेष गाड्या, पहा वेळापत्रक…

125

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे अदिलाबाद आणि दादर दरम्यान २ अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.

विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत-

  • विशेष गाडी क्रमांक 07058 सोमवार दि. ०५.१२.२०२२ रोजी आदिलाबाद येथून ७.०० वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पोहोचेल.
  • विशेष गाडी क्रमांक 07057 दादर येथून दि. ७.१२.२०२२ रोजी बुधवारी सकाळी ००.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १८.४५ वाजता आदिलाबादला पोहोचेल.
  • थांबे : किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण.
  • संरचना : दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १४ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे.
  • विशेष गाडी क्र. 01251/01253 आणि 01259 मध्ये अतिरिक्त डबे
  • 01251 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सेवाग्राम विशेष आणि
  • 01253 दादर- अजनी विशेष आता दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह १३ सामान्य द्वितीय श्रेणी डब्ब्यांसह (१२ ऐवजी) चालविण्यात येतील.
  • 01259 दादर- अजनी विशेष आता दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह १८ सामान्य द्वितीय श्रेणी डब्यांसह (१६ ऐवजी) चालविण्यात येतील.प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासना करीत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.