मुंबईकर रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेने (Western Railway) एक ऑनलाईन स्वरूपात प्रसिद्धीपत्रक प्रकाशित केले असून, या प्रसिद्धी पत्रकात रेल्वेच्या काही गाड्यांच्या टर्मिनस आणि संरचनेत बदल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय काही गाड्यांच्या वेळेतही बदल होणार आहे. अशा परिस्थितीत, प्रवासाला निघण्यापूर्वी, तुम्ही या गाड्यांची संपूर्ण यादी एकदा तपासणे आवश्यक आहे. (Indian Railway)
पश्चिम रेल्वेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ट्रेन क्रमांक 19003/04 वांद्रे टर्मिनस – भुसावळ खान्देश एक्स्प्रेस (Bandra Terminus – Bhusawal Khandesh Express) आणि ट्रेन क्रमांक 09051/52 मुंबई सेंट्रल – भुसावळ एक्स्प्रेसचे (Mumbai Central – Bhusawal Express) मूळ स्थानक बदलून दादर स्थानकातून सोडले जाणार आहे. तसेच ट्रेन क्रमांक 19015/19016 दादर-पोरबंदर एक्स्प्रेस (Dadar-Porbandar Express) मध्ये एक एसी कोच जोडला जाणार आहे. अशी माहिती या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. (Indian Railway)
या गाड्यांचे वेळापत्रक बदलले –
गाडी क्रमांक 19003/04 वांद्रे टर्मिनस – भुसावळ खान्देश एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 19003 वांद्रे टर्मिनस-भुसावळ खान्देश एक्स्प्रेसचे टर्मिनल वांद्रे टर्मिनस ऐवजी दादर येथून सुटणार आहे. ट्रेन क्रमांक 19003, जी सध्या दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी 00.05 वाजता वांद्रे टर्मिनसवरून सुटते, 04 जुलै, 2024 पासून दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी दादरहून 00.05 वाजता सुटेल. मध्यवर्ती स्थानकांवर या ट्रेनच्या थांबण्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 19004 भुसावळ-दादर खान्देश एक्सप्रेस 04 जुलै 2024 पासून वांद्रे टर्मिनसऐवजी दादर स्थानकावर 5.15 वाजता प्रवास समाप्त होईल. नवसारी आणि बोरिवली स्थानकांदरम्यानच्या आगमन आणि निर्गमनाच्या वेळा सुधारण्यात आल्या आहेत. (Indian Railway)
(हेही वाचा – Tamhini Ghat: भुशी डॅमनंतर आता ताम्हिणी घाटात दुर्घटना; धबधब्यात उडी मारणाऱ्या तरुणाने गमावला जीव)
गाडी क्रमांक 09051/52 मुंबई सेंट्रल – भुसावळ एक्सप्रेस
गाडी क्रमांक 09051/52 मुंबई सेंट्रल-भुसावळ ही रेल्वे गाडी मुंबई सेंट्रलऐवजी दादर स्थानकातून सोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 09051 दादर-भुसावळ एक्स्प्रेस आता दादरहून दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी 00.05 वाजता सुटेल. मध्यवर्ती स्थानकांवर या ट्रेनच्या थांबण्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. हा बदल 03 जुलै 2024 पासून लागू होईल. तसेच गाडी क्रमांक 09052 भुसावळ-दादर एक्स्प्रेस 03 जुलै 2024 पासून मुंबई सेंट्रल ऐवजी दादर स्थानकावर 5.15 वाजता प्रवास समाप्त होईल. संबंधित रेल्वेगाड्यांच्या फैऱ्या 03 जुलै 2024 ते 27 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. (Indian Railway)
(हेही वाचा – India Win T20 World Cup : आयसीसीच्या टी-२० विश्वचषक संघात भारताचे ६ खेळाडू, विराट कोहलीला स्थान नाही)
ट्रेन क्रमांक 19016/19015 पोरबंदर-दादर एक्स्प्रेसच्या संरचनेत सुधारणा –
ट्रेन क्रमांक 19016 पोरबंदर-दादर एक्स्प्रेसमध्ये 01 जुलै 2024 पासून आणि ट्रेन क्रमांक 19015 दादर-पोरबंदर एक्स्प्रेसमध्ये 04 जुलै 2024 पासून पुढील सूचना येईपर्यंत एक एसी कोच जोडण्यात आला आहे. दरम्यान, ट्रेन क्रमांक 09051 च्या विस्तारित ट्रिपसाठी बुकिंग 01 जुलै 2024 पासून PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळा, थांबे आणि संरचनेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, प्रवासी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात. (Indian Railway)
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community