Indian Railways : रेल्वेकडून पाच महिन्यांत 634.66 मेट्रिक टन मालवाहतूक

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 13.78 मेट्रिक टन अधिक मालवाहतूक

120
Indian Railways : भारतीय रेल्वेला मार्च तिमाहीत दणदणीत नफा

भारतीय रेल्वेने (Indian Railways) 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट या कालावधीत 634.66 मेट्रिक टन , एवढी मालवाहतूक केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 620.88 मेट्रिक टन एवढी मालवाहतूक झाली होती. भारतीय रेल्वेने या कालावधीत प्राप्त केलेला महसूल अंदाजे 1 लाख कोटी रुपये आहे, ज्यामध्ये मालवाहतूक विभाग, प्रवासी विभाग आणि इतर विविध महसुलाचा समावेश आहे. याच कालावधीत लोहखनिजाची वाहतूक 70.84 मेट्रिक टन एवढी झाली जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 61.30 मेट्रिक टन वाहतुकीपेक्षा 15.56% अधिक आहे.

याच कालावधीत, पिग आयर्न आणि फिनिश्ड स्टील या धातुमालाची वाहतूक 28.42 मेट्रिक (Indian Railways) टन एवढी झाली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 26.16 मेट्रिक टन झाली होती, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही वाढ 8.63% अधिक नोंदली गेली आहे.

याच कालावधीत, 24.13 मेट्रिक टन एवढ्या (Indian Railways) खतमालाची वाहतूक झाली जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत साध्य केलेल्या 22.25 मेट्रिक टन वाहतुकीपेक्षा जास्त आहे, जी 8.45% ची वाढ दर्शवते.

याच कालावधीत, सिमेंट ची वाहतूक गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 59.44 मेट्रिक टन क्षमतेच्या तुलनेत यंदा 63.29 मेट्रिक टन आहे, जी 6.48% ची वाढ दर्शवते.

याच कालावधीत, कंटेनर सुविधेच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या (Indian Railways) याच कालावधीत साध्य केलेल्या 32.60 मेट्रिक टन वाहन क्षमतेपेक्षा यंदा 34.31 मेट्रिक टन एवढी मालवाहतूक झाली आहे, जी 5.22% ची वाढ दर्शवते.

(हेही वाचा – Water Recycling : जलशुद्धीकरणातून वाया जाणाऱ्या पाण्याची नवी जोड: मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यात १३ते १६ दशलक्ष लिटर एवढी वाढ)

याच कालावधीत, पीओएल (बंदर) मालवाहतूक ही 20.59 मेट्रिक टन इतकी आहे जी मागील वर्षीच्या याच कालावधीत (Indian Railways) साध्य झालेल्या 19.91 मेट्रिक टन क्षमतेपेक्षा जास्त आहे, जी 3.41% ची वाढ दर्शवते.

याच कालावधीत, कोळशाची वाहतूक गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 305.39 मेट्रिक टन क्षमतेच्या तुलनेत यंदा 311.53 मेट्रिक टन इतकी झाली.

या व्यतिरिक्त, रेल्वेने ऑटोमोबाईल वस्तूंच्या वाहतुकीत 26% ची वाढ दर्शविली आहे तर ऑटोमोबाईल वस्तूंच्या वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये 24.5% ची वाढ दिसून आली आहे.

वर्ष 2023 च्या ऑगस्ट महिन्यात, भारतीय रेल्वेने 126.95 मेट्रिक टन एवढ्या क्षमतेने (Indian Railways) मालवाहतूक केली जी मागील वर्ष 2022 च्या ऑगस्ट महिन्यात,119.33 मेट्रिक टन एवढ्या क्षमतेने झाली होती, ज्यामध्ये 6.38% ची वाढ दिसून आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.