भारतीय रेल्वेने 5 नोव्हेंबर 2022 पासून वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनच्या वेळेत बदल करण्याची घोषणा केली आहे. मुंबई ते गांधीनगर राजधानी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या वेळेत रेल्वेकडून बदल करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झेंडा दाखविल्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ट्रेन क्रमांक 20901 मुंबई सेंट्रल – गांधीनगर राजधानी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस वापी स्थानकात 8 वाजता पोहोचेल, तर तेथून ती 8.02 वाजता सुटणार आहे. पूर्वी ती 8.04 ला पोहोचत होती आणि 8.06 वाजता रवाना होत होती.
(हेही वाचा – म्हैस, गाय आणि आता बैलाची ‘वंदे भारतला’ टक्कर! एक्स्प्रेसचा पुढील भाग तुटला)
परतीच्या मार्गावर, ट्रेन नंबर 20902 गांधीनगर राजधानी ते मुंबई सेंट्रल वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस बडोदा येथे 15.53 वाजता पोहोचेल आणि 15.56 वाजता रवाना होईल. याआधी ही ट्रेन 15.50 पोहोचून 15.55 वाजता रवाना होत होती. तर वापी स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 18.38 ऐवजी 18.13 वाजता पोहोचेल आणि 18.40 ऐवजी 18.15 वाजता रवाना होणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या वेळेत 20 मिनिटांचा बदल
या मार्गावरील वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेन उर्वरित स्थानकांवर वेळापत्रकानुसार धावणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या वेळेत 20 मिनिटांचा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी या नव्या वेळापत्रकानुसार प्रवास करावा, असे रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community