Indian Railways : रेल्वेने जनरल तिकिटांच्या नियमात केला बदल; प्रवाशांना मिळेल ही सुविधा

रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना मोठा दिलासा देत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने अ‍ॅपवरून तिकीट बुक करणाऱ्या नागरिकांसाठी अंतर वाढवले आहे. अनारक्षित तिकिटे बुक करण्यासाठीच्या अंतराची सुविधा उपनगरी नसलेल्या म्हणजेच एक्स्प्रेससाठी २० किमी अंतरापर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.

( हेही वाचा : 7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकरच लागू होणार?)

आतापर्यंत प्रवासी एक्स्प्रेस गाड्यांची तिकीट २ किमीपर्यंत बुक करू शकत होते या नियमांमध्ये आता शिथिलता करण्यात आलेली आहे. मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यामुळे अनेकांना कमी अंतरावरून तिकीट काढणे शक्य होत नव्हते. परंतु आता प्रवास घरबसल्या एक्स्प्रेस ट्रेनचे तिकीट काढू शकणार आहे. रेल्वे मंत्रालयाने तिकीट एक्स्प्रेस ट्रेनच्या तिकीट बुकिंगचे अंतर २० किमी केले आहे.

प्रवाशांना फायदा

रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचा प्रवाशांना सर्वाधिक फायदा होणार आहे. अनारक्षित तिकीट प्रवासी सहज बुक करू शकतात. कमी अंतर, मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने अनेकवेळा प्रवाशांना तिकीट काढता येत नव्हते. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप व्हायचा. आता २० किमी अंतराच्या निर्णयामुळे एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here