भारतीय रेल्वेकडून सातत्याने प्रवाशांना नवनवीन सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. बाहेरगावी जाणा-या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांना जेवणाची सोय देण्यात येते. आता भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना देण्यात येणा-या या जेवणाच्या मेनूमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मधुमेही रुग्ण आणि लहान मुलांना त्यांच्या विशिष्ट गरजेनुसार आहार देण्यात येणार आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन(IRCTC)ला जेवणाच्या मेनूमध्ये बदल करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून सवलत देण्यात आली आहे. या नव्या सुविधेनुसार प्रवाशांना आपल्या आवडीनुसार प्रादेशिक खाद्यपदार्थ मिळणार आहेत.
कसा असणार नवा मेनू?
या नवीन मेनूनुसार प्रवाशांना प्रादेशिक खाद्यपदार्थांसोबतच आपल्या आवडीचे पदार्थ, सिझनल पदार्थ यांचा देखील आस्वाद घेता येणार आहे. तसेच मधुमेही रुग्ण,लहान मुले यांच्यासाठी हेल्थ फूडच्या पर्यायासह ग्रुपसाठी विशेष मेनूचा देखील समावेश असणार आहे.प्रीपेड ट्रेन्समधील मेनू आयआरसीटीसीने आधीच ठरवलेल्या बजेटनुसार देण्यात येतील.
(हेही वाचाः UTS App मध्ये रेल्वे करणार ‘हा’ बदल! तिकीट, पास काढताना प्रवाशांना होणार मोठा फायदा)
गुणवत्तेत तडजोड नाही
तसेच ट्रेनमध्ये ए-ला कार्ट खाद्यपदार्थ आणि ब्रँडेड खाद्यपदार्थांना एमआरपीवर परवानगी देण्यात येईल. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही, असेही IRCTC ने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community