भारतीय रेल्वे वाहतूक व्यवस्था ऐतिहासिक आणि आकर्षक आहे. प्रत्येक प्रवाशासाठी भारतीय रेल्वेमार्ग आनंदाची साक्षीदार आहे, असे मानले जाते; कारण प्रत्येक प्रवाशाने आयुष्यात एकदा तरी भारतीय रेल्वेने प्रवास करण्याचा आनंद घेतलेला असतोच. भारताच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला वेग देणाऱ्या भारतीय रेल्वेचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंदवण्यात आले आहे. (Indian Railways)
रेल्वे मंत्रालयाने २६ फेब्रुवारी २०२४ रोजी २,१४० ठिकाणी सार्वजनिक सेवा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व ठिकाणच्या कार्यक्रमात ४०,१९,५१६ लोकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमात ‘एकापेक्षा जास्त ठिकाणी’ सेवा देण्यासाठी भारतीय रेल्वेचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आले तसेच भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) उत्कृष्ट आणि सर्वसमावेशक प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
(हेही वाचा – Manipur Secretariat : मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळील सचिवालयानजीकच्या इमारतीला भीषण आग)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोड ओव्हर/ अंडर रेल्वे पुलांचे उद्घाटन आणि रेल्वे स्थानकांची पायाभरणी या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय रेल्वेचे उत्कृष्ट सर्वसमावेशक कार्य आणि तिच्या गतिशीलतेचे कौतुक करण्यात आले.
(हेही वाचा – Manipur Secretariat : मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळील सचिवालयानजीकच्या इमारतीला भीषण आग)
Join Our WhatsApp Community