प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कायमंच वेगवेगळे निर्णय घेण्यात येत आहेत. आता प्रवाशांना तिकीट देण्यासाठी रेल्वेकडून नवीन सुविधा सुरू करण्यात येत आहे. यानुसार आता ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन(ATVM)द्वारे तिकीट काढताना सुद्धा प्रवाशांना डिजीटल पेमेंट करता येणार आहे. त्यामुळे आता तिकीट आणि पासही कॅश न देता काढता येणं शक्य आहे.
(हेही वाचाः Income Tax भरताना आता ही माहिती सुद्धा द्यावी लागणार, आयकर विभागाचे नवे नियम)
यूपीआय आणि क्यूआर कोडची सुविधा
सध्या डिजीटल ट्रॅन्झॅक्शनद्वारे होणा-या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेकदा रेल्वे स्टेशनवर तिकीट काढताना सुट्ट्या पैशांच्या गोंधळामुळे प्रवाशांची गैरसोय होते. तसेच अनेकदा प्रवाशांना तिकीट किंवा पासासाठी लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागते. त्यामुळे आता रेल्वे स्टेशनवर असणा-या ATVM मशिनद्वारे डिजीटल पेमेंट करुन तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट किंवा मासिक पास काढण्याची सुविधा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यासाठी या मशिनवर यूपीआय आणि क्यूआर कोडची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच या माध्यमातून प्रवाशांना आपले ATVM स्मार्ट कार्ड रिचार्ज करता येणार आहे.
(हेही वाचाः महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार उचलणार आणखी एक पाऊल)
प्रवाशांना मिळणार दिलासा
ही सुविधा सुरू केल्यामुळे आता प्रवाशांना रेल्वेच्या लांबच लांब रांगांमध्ये उभे राहण्यापासून दिलासा मिळणार आहे. रेल्वे तिकीट किंवा पासासाठी तासन् तास रांगेत उभे राहण्याच्या तक्रारी प्रवाशांकडून रेल्वे बोर्डाकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळेच प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community