आता रेल्वेमध्येही मिळणार मराठमोळी पुरणपोळी, ‘असा’ आहे IRCTC चा नवा मेन्यू

107

भारतीय रेल्वेने नुकत्याच आपल्या मेन्यू कार्डमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता IRCTC कडून अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता सणासुदीच्या काळात मिळणा-या गोडधोड पदार्थांचा आस्वाद आता ट्रेनमध्येही घेता येणार आहे.

महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा समावेश

Indian Railway Catering and Tourism Corporation(IRCTC)कडून भारतीय रेल्वेमध्ये भोजनाची खास सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची ओळख सांगणारी गोड पुरणपोळी देखील ट्रेनमध्ये मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यासोबतच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पिकवल्या जाणा-या बाजरीच्या पदार्थांचा देखील रेल्वेकडून आपल्या मेन्यू कार्डमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फतवा, डॉक्टर आणि वैद्यकीय अधिका-यांना बसणार चाप)

रेल्वेचा निर्णय

लांबचा प्रवास करण्यासाठी प्रवासी नेहमीच भारतीय रेल्वेला प्राधान्य देतात. या प्रवासामध्ये रेल्वेकडून प्रवाशांना जेवणाची सोय देखील देण्यात येते. पण अनेकदा तेच तेच पदार्थ खावे लागल्याने प्रवासादरम्यान काही खास पदार्थांचा आस्वाद घेता यावा अशी प्रवाशांची इच्छा असते. हीच इच्छा आता भारतीय रेल्वेने पूर्ण करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे देशभरातील स्थानिक पदार्थांचा रेल्वेकडून आपल्या मेन्यू कार्डमध्ये समावेश करण्यात येणार आहे. तसेच डायबेटिस सारखे आजार असणा-यांसाठी आणि लहान मुलांसाठी देखील काही विशेष पदार्थ लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये देण्यात येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.