IRCTC ने सांगितलेली ‘ही’ सोपी ट्रिक वापरा, कन्फर्म तिकीट मिळण्याची वाढेल शक्यता

131

आपल्या गावी किंवा देशात विविध ठिकाणी फिरायला जाण्यासाठी प्रवाशांकडून कायमंच रेल्वेला पसंती देण्यात येते. त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवसांत रेल्वे तिकीट बुकींगसाठी मारामार होते. त्यामुळे भारतीय रेल्वेकडून तत्काळ तिकीट बुकिंगची सुविधा देखी देण्यात येते. यामुळे 24 तासांच्या आत कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता असते. पण काही ट्रिक्स वापरल्या तर हमखास कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते.

मास्टर लिस्टची सुविधा

इंडियन रेल्वे कॅचरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन(IRCTC)च्या वेबसाईटवर आपल्याला तत्काळ तिकीट बूक करता येते. पण एकाच वेळी अनेक जण तत्काळ तिकीटासाठी झुंजत असल्यामुळे अनेकदा आपल्याला तत्काळ तिकीट मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येते. त्यामुळे आता यावर तोडगा म्हणून IRCTC ने मास्टर लिस्टची एक सुविधा सांगितली आहे.

(हेही वाचाः IRCTC बदलणार जेवणाचा मेनू, भारतीय रेल्वे प्रवाशांना देणार ‘ही’ खास सुविधा)

कसे कराल बुकिंग?

एसी कोचमध्ये तत्काळ तिकीट बूक करण्यासाठी सकाळी 10 नंतर आणि नॉन-एसी तिकीट बुकिंगसाठी सकाळी 11 नंतर मास्टर लिस्टची सुविधा मिळते. ज्या व्यक्तीला तिकीट काढायचे आहे त्याने आपले नाव आणि वय IRCTC च्या मास्टर लिस्टमध्ये सेव्ह करावं. त्यामुळे तत्काळ तिकीट बूक करताना संपूर्ण तपशील भरायची गरज भासत नाही. अवघ्या काही सेकेंदांत आपल्याला आपले तिकीट बूक करता येते. त्यामुळे तिकीट बूक करण्यासाठी लागणारा वेळ वाचतो आणि तिकीट मिळण्याची शक्यता देखील वाढते.

अशी बनवा मास्टर लिस्ट

  • IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर MY Account चा पर्याय निवडा
  • त्यानंतर Add Profile वर जाऊन Add/Modify Masterlist या पर्यायावर क्लिक करा
  • तिथे प्रवाशांचे नाव,जन्मतारीख,लिंग,बर्थ आणि भोजन इत्यादींबाबत तपशील भरुन सबमिट बटणवर क्लिक करा
  • यानंतर मास्टर लिस्ट तयार करता येईल आणि तिकीट बूक करताना थेट आपल्याला पेमेंट करता येईल
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.