रेल्वेच्या डब्यांत होणार फिरते रेस्टॉरंट… या सात स्थानकांत करणार उभारणी

102

अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी भारतीय रेल्वेने अनोखे पाऊल उचलले आहे. पश्चिम मध्य रेल्वेने मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर आणि भोपाळ विभागांतर्गत सात प्रमुख रेल्वे स्थानकांवर रेल्वे कोच रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत, जुन्या रेल्वे डब्यांचे नूतनीकरण करुन, त्याचे रुपांतर रेल्वे कोच रेस्टॉरंटमध्ये केले जाणार आहे.

फिरत्या स्वरुपातील रेस्टॅारंट 

रेल्वे कोच रेस्टॉरंटमध्ये रुपांतरित झाल्यानंतरही हे ट्रेनचे डबे भारतीय रेल्वेची मालमत्ता म्हणून कायम राहणार आहेत. हा करार पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येणार आहे. पश्चिम मध्य रेल्वेकडून यासाठी प्रत्येक ठिकाणी 200 चौरस फूट क्षेत्र देण्यात आले आहे. नॉन फेअर रिवेन्यू आयडिया(NINFRI) या योजनेंतर्गत जबलपूर, मदन महल, कटनी मुरवारा, सतना आणि रीवा, भोपाळ आणि इटारसी या सात रेल्वे स्थानकांवर भारतीय रेल्वेच्या जबलपूर विभागाने रेल्वे कोच रेस्टॉरंट्स उभारण्याची योजना आखली आहे. हे रेल्वे कोच रेस्टॉरंट्स संबंधित स्थानकांमध्ये फिरत्या स्वरुपात सुरू केले जाणार आहेत.

(हेही वाचाः हे माहीत आहे का? तुमच्या ‘परफ्युम’ मध्ये आहे व्हेल माशाची ‘उलटी’)

महसूल प्राप्ती वाढणार

गेल्या वर्षी, आसनसोल स्टेशनच्या परिसरात पहिले फिरते ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू केले. या प्रकारचं पहिलं रेल्वे कोच रेस्टॉरंट रेल्वे प्रवाशांसाठी पश्चिम बंगालमधील आसनसोल रेल्वे स्थानकात उघडण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या अनोख्या प्रयत्नातून पश्चिम मध्य रेल्वेचे जवळपास 3.33 करोड रुपयांच्या अतिरिक्त महसूल प्राप्तीचे लक्ष्य आहे.

अंदाजित महसूल प्राप्ती

  • जबलपूर स्थानक- 13 लाख रुपये
  • मदन महल स्थानक- 8.20 लाख रुपये
  • कटनी मुरवारा स्थानक- 18.20 लाख रुपये
  • सतना स्थानक- 16.80 लाख रुपये
  • रीवा स्थानक- 6.57 लाख रुपये
  • भोपाळ स्थानक- 11.74 लाख रुपये
  • इटारसी स्थानक- 11.69 लाख रुपये

(हेही पहाः साडी नेसली म्हणून तिला रेस्टॉरंटमध्ये…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.