भारतीय रेल्वेने जून २०२४ मध्ये १३५.४६ मेट्रिक टन मालवाहतुकीचा टप्पा गाठला असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील म्हणजे जून २०२३ च्या १२३.०६ मेट्रिक टन च्या तुलनेत सुमारे १०.०७% ची वाढ नोंदवली आहे. भारतीय रेल्वेने या कालावधीत प्राप्त केलेला मालवाहतुकीचा महसूल जून २०२३ च्या १३,३१६.८१ कोटी रुपयांच्या तुलनेत १४,७९८.११ कोटी रुपये इतका असून त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ११.१२% ची वाढ दिसून आली. (Indian Railway)
भारतीय रेल्वेने या कालावधीत ६०.२७ मेट्रिक टन कोळसा (आयात केलेला कोळसा वगळून), ८.८२ मेट्रिक टन आयात कोळसा, १५.०७ मेट्रिक टन लोहखनिज, ५.३६ मेट्रिक टन पिग आयर्न आणि फिनिश्ड स्टील, ७.५६ मेट्रिक टन सिमेंट (क्लिंकर वगळता), ५.२८ मेट्रिक टन क्लिंकर, ४.२१ मेट्रिक टन अन्नधान्य, ५.३० मेट्रिक टन खते, ४.१८ मेट्रिक टन खनिज तेल, कंटेनर सुविधेच्या माध्यमातून ६.९७ मेट्रिक टन आणि इतर वस्तूंमध्ये १०.०६ मेट्रिक टन इतकी वाहतूक केली. (Indian Railway)
(हेही वाचा – Ambadas Danve यांचं निलंबन मागे घेण्यासाठी सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र!)
”हंग्री फॉर कार्गो” हा मंत्र अनुसरत भारतीय रेल्वेने व्यवसाय सुलभतेत सुधारणा करण्यासाठी तसेच स्पर्धात्मक किमतीत सेवा वितरण सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ग्राहककेंद्रित दृष्टीकोन आणि सुगम धोरण निर्मितीद्वारे समर्थित व्यवसाय विकास युनिट्सच्या कार्यामुळे रेल्वेला हे महत्त्वपूर्ण यश साध्य करण्यात मदत झाली. (Indian Railway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community