थुंकलेले डाग साफ करण्यासाठी भारतीय रेल्वेची ‘अनोखी’ योजना

प्रवासी कधीही कुठेही स्पिगॉट (पाउच) मध्ये थुंकू शकतात.

71

भारतीय रेल्वेचा प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वेने प्रवास करताना अनेक प्रकारचे लोक आपल्याला दिसतात. रेल्वेला आपलीचं मालमत्ता समजून अनेक प्रवासी गुटखा, तंबाखू, पान खाऊन थुंकून रेल्वे परिसर अस्वच्छ करतात. हेच, थुंकलेले डाग स्वच्छ करण्यासाठी भारतीय रेल्वे दरवर्षी एक-दोन नाही, तर सुमारे १२०० कोटी आणि लाखो लिटर पाणी खर्च करते. प्रवाशांना रेल्वे परिसरात थुंकण्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि या प्रचंड खर्चावर नियंत्रण म्हणून भारतीय रेल्वेकडून अनोखी उपाययोजना राबवण्यात येणार आहे.

काय आहे भारतीय रेल्वेची योजना?

वायफळ, प्रचंड खर्च होऊ नये, म्हणून स्पिगॉट (पाउच) तयार केले जातील. स्पिगॉटचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही व्यक्ती हे स्पिगॉट सहजपणे आपल्या खिशात ठेवू शकते. या पाउचच्या साहाय्याने प्रवासी कधीही कुठेही स्पिगॉट (पाउच) मध्ये थुंकू शकतात. पश्चिम, उत्तर आणि मध्य अशा रेल्वेच्या तीनही झोनचे कंत्राट नागपूरच्या एका स्टार्टअप इजीपिस्टला दिले आहे. रेल्वेच्या ४२ स्थानकांवर वेंडिंग मशीन किंवा कियोस्कची स्थापना केली जाणार आहे. त्यामुळे ५ ते १० रुपयांपर्यंत थुंकीचे पाउच उपलब्ध होणार आहेत. यामुळे आता रेल्वेचे कोटी रुपये वाया जाण्यापासून वाचणार आहेत.

(हेही वाचा : थेट महाविद्यालयालाच उच्च न्यायालयाने ठोठावला दंड)

कसे असतील हे स्पिगॉट (पाउच)?

स्पिगॉट (पाउच) हे बायोडिग्रेडेबल असतील, यात मॅक्रोमॉलेक्यूल पल्प टेक्नॉलॉजी आहे, जी लाळेमध्ये असलेल्या बॅक्टेरिया आणि व्हायरसला लॉक करते, यामुळे हे स्पिगॉट १५ ते २० वेळा वापरू शकतो. या स्पिगॉटमध्ये बिया असतात, ज्या थुंकी शोषून घेतात आणि त्यांना घन बनवतात. यामुळेच एकदा वापरल्यानंतर, हे पाउच चिखलात किंवा मातीमध्ये टाकल्यावर झाडांच्या वाढीस कारणीभूत ठरणार आहेत, असे स्पिगॉट (पाउच) उत्पादकांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.