रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वे स्टेशन, लोकल किंवा एक्सप्रेस गाड्यांमध्ये लाल रंगाच्या पिचका-यांची रंगरंगोटी आपल्याला दिसते. ही रंगरंगोटी पाहून आपण अनेकदा नाकं देखील मुरडली आहेत. पण रेल्वे प्रशासन हे रंगकाम स्वच्छ करण्यासाठी तब्बल 1200 कोटी रुपये खर्च करत असल्याची माहिती मिळत आहे. पण हा खर्च कमी करण्यासाठीच आता रेल्वेकडून एक युक्ती करण्यात आली आहे.
वेंडिंग मशीन बसवणार
रेल्वे स्टेशन किंवा गाड्यांमध्ये थुंकणा-या प्रवाशांवर निर्बंध घालण्यासाठी आता रेल्वेकडून 42 रेल्वे स्थानकांवर वेंडिंग मशीन लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या वेंडिंग मशीनमध्ये 5 आणि 10 रुपयांचे स्पिटून पाऊच(थुंकण्यासाठी पाऊच) दिले जाणार आहेत. काही ठिकाणी रेल्वे स्थानकांवर ही सुविधा सुरू देखील करण्यात आली आहे.
(हेही वाचाः 21 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवरील ‘या’ लोकल होणार 15 डब्यांच्या, बघा संपूर्ण यादी)
रेल्वेच्या पश्चिम,उत्तर आणि मध्य रेल्वेकडून नागपूरच्या स्टार्ट अप उद्योगाला कंत्राट दिले आहे. थुंकणा-या व्यक्ती हे पाऊच सहज आपल्या खिशात घेऊन फिरू शकतात, जेणेकरुन थुंकण्यासाठी त्यांना ठिकठिकाणी रंगरंगोटी करण्याची गरज नाही.
विघटनशील पाऊच
हे पाऊच बायोडिग्रेडेबल असून त्याचा 15 ते 20 वेळा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर हे पाऊच मातीमध्ये पुरले जाऊ शकतात आणि त्याचे विघटन केले जाते. त्यामुळे रेल्वेच्या या युक्तीमुळे नक्कीच रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ राहतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
(हेही वाचाः IRCTC ने सांगितलेली ‘ही’ सोपी ट्रिक वापरा, कन्फर्म तिकीट मिळण्याची वाढेल शक्यता)
Join Our WhatsApp Community