Indian Railways : भारतीय रेल्वेला मार्च तिमाहीत दणदणीत नफा

Indian Railways : आयआरसीटीसी कंपनीचा मार्च तिमाहीतील निव्वळ नफा हा २८४ कोटी रुपये इतका आहे.

173
Indian Railways : भारतीय रेल्वेला मार्च तिमाहीत दणदणीत नफा
  • ऋजुता लुकतुके

रेल्वे कंपनीसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील तीन महिन्यात रेल्वे कंपनीने मोठा नफा मिळवला आहे. याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना देखील होणार आहे. कारण झालेल्या नफ्यानंतर कंपनीनं गुंतवणूकदारांना ४ रुपयांचा लाभांश जाहीर केलाय. प्रचंड तिकीट विक्रीमुळं आयआरसीटीसीला (IRCTC) मोठे उत्पन्न मिळाले आहे. (Indian Railways)

IRCTC नुकतेच मार्च तिमाहीच्या उत्पन्नाच्या बाबतीमधील आकडेवारी जाहीर केलीय. यामध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्याबद्दल सविस्तर माहिती दिलीय. मागील तीन महिन्यात कंपनीला निव्वळ नफा हा २८४ कोटी रुपयांचा मिळाला आहे. नफ्यात वाढ झाल्यामुळं कंपनीनं गुंतवणूकदारांना एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. गुंतवणूकदारांना कंपनीनं ४ रुपयांचा लाभांश जाहीर केलाय. (Indian Railways)

रेल्वेचा प्रवास हा सुखकर आणि आरामदायी मानला जातो. दररोज भारतीय रेल्वेने (Indian Railways) लाखो लोक प्रवास करतात. ज्याचा थेट फायदा कंपनीला होतो. अलीकडेच, भारतीय रेल्वे कंपनी IRCTC ने त्यांचे तिमाही निकाल सादर केले आहेत. निकालानुसार कंपनीने या कालावधीत मोठी कमाई केली आहे. कंपनीच्या प्रचंड कमाईमागील कारण म्हणजे तिकीट विक्रीतील झालेली मोठी वाढ. आयआरसीटीसी कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या मार्च तिमाहीत २८४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण दोन टक्क्यांनी अधिक आहे. त्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांसाठी ४ रुपयांचा लाभांशही जाहीर केलाय. (Indian Railways)

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : माजी संचालिकेसह दोन जणांना गोव्यातून अटक)

कंपनीच्या महसुलात २० टक्क्यांची वाढ

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार IRCTC ने अद्याप लाभांशाची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. लाभांश देण्यासाठी कंपनी २५६ कोटी रुपये खर्च करणार आहे. आर्थिक वर्ष २४ साठी कंपनीकडून हा अंतिम लाभांश असेल. त्याचबरोबर या कंपनीत सरकारची ६२.४ टक्के भागीदारी आहे. आज बाजार उघडताच IRCTC चे शेअर्स ४ टक्क्यांच्या घसरणीसह १०३२.८० रुपयांवर व्यवहार करत होते. कंपनीचे मार्केट कॅप ८७,१५२ कोटी रुपये झाले आहे. या शेअरने गेल्या ३ महिन्यांत १९ टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, त्यात १ महिन्यात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Indian Railways)

रेल्वेच्या तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रोज लाखो लोक रेल्वेनं प्रवास करत आहेत. यामुळं रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या महसुलात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत तो ११५४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. (Indian Railways)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.