रेल्वेने घेतला मोठा निर्णय! थर्ड एसी इकोनॉमी कोच बंद होणार; जाणून घ्या तिकीट दरांचे संपूर्ण गणित…

रेल्वेने एसी इकोनॉमी कोच संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. गाड्यांमधील थर्ड इकोनॉमी एसीचे डबे आता फक्त नावापुरते असतील. या इकोनॉमी एसीच्या डब्यांचे मूळ भाडेही थर्ड एसी प्रमाणे आकारण्यात येणार आहे. सर्व एसी डब्यांनी एकसमान सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वेने हा महत्त्वाचा बदल केला आहे. एसी इकोनॉमी वर्गातील प्रवाशांना थर्ड एसीप्रमाणे समान भाडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता एसीच्या सर्व डब्यांमध्ये बेडरोल सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे, रेल्वेने हे आदेश जारी केले आहेत.

( हेही वाचा : रोहितच्या चुका हार्दिकने सुधारल्या! टीम इंडियात झाले ३ मोठे बदल)

सीट क्रमांक 81, 82 आणि 83 च्या बुकिंगवर बंदी

इकोनॉमी कोचच्या प्रवाशांना बेड रोलची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या कोचच्या तीन सीटचे बुकिंगही केले जाणार नाही. आता प्रवाशांना इकोनॉमी कोचच्या 81, 82 आणि 83 क्रमांकाच्या सीटवर प्रवास करता येणार नाही. या आसनांचा वापर बेड रोल ठेवण्यासाठी केला जाईल. ज्या प्रवाशांनी 20 सप्टेंबर रोजी किंवा त्यानंतर इकोनॉमी कोचमध्ये या जागांसाठी तिकीट बुक केले आहे, त्यांना आपत्कालीन कोट्यातून अतिरिक्त जागा उपलब्ध करून दिल्या जातील. प्रवासापूर्वी त्यांना एसएमएसद्वारे जागा बदलण्याची माहिती दिली जाईल.

भाड्याचे गणित

उदाहरणार्थ रांची ते आनंद विहार

थर्ड एसी इकोनॉमी कोचचे भाडे

मूळ भाडे – 1334 रुपये
आरक्षण शुल्क – 40 रुपये
सुपरफास्ट फी – 45 रुपये
जीएसटी – 71 रुपये
एकूण भाडे – 1490 रुपये

थर्ड एसी भाडे

मूळ भाडे – 1434 रुपये
आरक्षण शुल्क – 40 रुपये
सुपरफास्ट फी – 45 रुपये
जीएसटी – 76 रुपये
एकूण भाडे – 1595 रपये

यापूर्वी तिकीट भाड्यात फरक हा 105 रुपयांचा होता परंतु आता थर्ड एसी इकोनॉमी कोच सरेंडर करण्यात येणार असून दोन्ही डब्यांमध्ये समान भाडे द्यावे लागेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here