महिला प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय!

107

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध निर्णय घेत आहे. महिला प्रवाशांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना ट्रेनमधील सीटवर बाळासोबत झोपणे कठीण जाते. हे लक्षात घेऊन रेल्वेने ट्रेनमधील लोअर बर्थला (lower birth) बेबी बर्थ जोडला आहे.

बेबी बर्थ

लखनौ ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या लखनौ मेल ट्रेनमध्ये एक नवीन कोच तयार करण्यात आला आहे. या गाडीत महिला प्रवाशांच्या नवजात बालकासाठी बेबी बर्थ जोडण्यात आला आहे. यामुळे मातांना त्यांच्या बाळासोबत आरामात झोपता येईल. ही सीट फोल्डही करता येते. तसेच हे बेबी बर्थ वर आणि खाली केले जाऊ शकते. बेबी बर्थमध्ये मुलांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. बेबी बर्थ ७७० मिमी लांब आणि २५५ मिमी रुंद असेल तर या बर्थची जाडी ७६.२मिमी ठेवण्यात आली आहे. लखनौ गाडीत 8 मे मदर्स डे निमित्ताने हा बेबी बर्थ जोडण्यात आला.

New Project 11 2

( हेही वाचा : वेतनवाढीबाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!  )

ही सुविधा सगळ्या गाड्यांमध्ये सुरू झाल्यावर बेबी बर्थ सुविधेसाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी या सीटचे बुकिंग करण्याची तरतूद नाही. रेल्वे सध्या ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूर्ण तिकीट आकारते. पूर्वी हे दर ५० टक्के होते. पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झालेली ही सुविधा प्रवाशांच्या प्रतिक्रिया मिळाल्यानंतर आणखी गाड्यांमध्ये विस्तारीत करता येईल. असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.