- ऋजुता लुकतुके
सोमवारी २२ जानेवारीला भारतीय शेअर बाजार बंद होते. पण, जगभरातले सुरू होते. आणि त्यामुळे तो दिवस संपेपर्यंत भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात एक वेगळाच विक्रम जमा झाला. बाजारातील भांडवल मूल्याच्या निकषावर भारतीय शेअर बाजार हे आता हाँग काँगला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. भारतीय शेअर बाजारांचं एकत्रित मूल्य हे ४.३३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकं झालं आहे. तर हँगसेनचं मूल्य ४.२९ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकं आहे. ब्लूमबर्गने याविषयीची बातमी दिली आहे. (Indian Stock Exchange)
Indian stock market cap at $4.33 trillion crosses Hong Kong ( $4.29 Trillion) to become the 4th largest in the world.
It was ~$500-600 Bn when I started my equity journey in 2005-2006.
The best is yet to come !!!
— Gurmeet Chadha (@connectgurmeet) January 23, 2024
(हेही वाचा – Ayodhya Ram mandir : 15 किलो सोने, 18 हजार हिरे आणि पाचू… रामलल्लाचे दागिने बनवले केवळ 12 दिवसांत)
भारतीय बाजारांमध्ये २१ अब्ज अमेरिकन डॉलर परकीय गुंतवणूक
भारतीय शेअर बाजारांनी ४ ट्रिलियनचा आकडा गेल्यावर्षी ५ डिसेंबरला पहिल्यांदा गाठला होता. अख्खं २०२३ साल भारतीय शेअर बाजारांसाठी चांगलं गेलं. यात किरकोळ गुंतवणूकदारांची वाढती संख्या, परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजार आणि इथली अर्थव्यवस्था यावर दाखवलेला विश्वास, कंपन्यांचे तिमाही निकाल तसंच देशातील आर्थिक बदल यांचा वाटा मोठा आहे. (Indian Stock Exchange)
भारताने मागच्या काही वर्षांत चीनला पर्याय अशी ओळख निर्माण केली आहे. शिवाय चीनच्या खालोखाल इथली बाजारपेठही मोठी आहे. त्यामुळे चीनमधील बदलत्या परिस्थितीला पर्याय म्हणून जागतिक कंपन्या आता भारताकडे बघत आहेत. कोव्हिड १९ नंतर चीनबद्दलचा विश्वासही कमी झाला आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारांचा विकास झाला आहे. तर २०१९ पासून हाँग काँगमधील लोकशाहीवादी आंदोलनाने जोर धरला आहे. तसंच चीनमधील परिस्थितीचा फटकाही त्यांना बसला आहे. परिणामी, २०२१ पासून तिथलं बाजार भांडवल मूल्य तब्बल ६ ट्रिलियन अमेरिकन डॉलरनी कमी झालं आहे. पूर्वी हाँग काँग शेअर बाजारात इनिशिअल पब्लिक ऑफरिंगची धूम असायची. तो ओघही आता कमी झाला आहे. उलट भारतीय बाजारांमध्ये एकट्या २०२३ वर्षात २१ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी परकीय गुंतवणूक आली. (Indian Stock Exchange)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community