शेअर मार्केट उघडताच सुरुवातीला सेन्सेक्स 386 अंकांनी वधारला तर निफ्टीत 105 अंकांची उसळी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील तेजीचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. त्यामुळेच निर्देशांकातही तेजी दिसून आली. ओएनजीसी, पवार ग्रीड, एसबीआय, रिलायन्ससारख्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्सही तेजीत आहेत. 7 पैकी 6 कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.
( हेही वाचा: बोरिवलीतील केंद्रीय दूरसंचार विभागाच्या साडेपाच एकर जागेवरील अतिक्रमण साफ; एकाच दिवसात हटवली ५५ बांधकामे )
या कंपन्यांचे शेअर्सची सुरुवात टाॅपमध्ये
सेन्सेक्समध्ये टेक महिंद्रा, लार्सन अॅंड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एचडीएफसी आणि सन फार्मा यांचा सर्वाधिक फायदा झाला.
- TECHM-3.81%
- ONGC-3.80%
- अॅडॅनिएंट-2.71%
- अदानी पोर्टस- 2.41%
- तर टायटन आणि मारुती या कंपन्यांचे नुकसान झाले.
हे शेअर्स गडगडले
ग्रासिम 0.32 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.27 टक्के, हिरो मोटोकाॅर्प 0.25 टक्के, बीपीसीएल 0.23 टक्के, एसबीआय लाइफ इन्शुरन्स 0.13 टक्के, इंडिगो 4.14 टक्के, व्होडाफोन आयडिया 1.94 टक्के, चंबळ फर्टिलायझर 1.56 टक्के, इंडिया बाटा 0.56 टक्क्यांच्या घसरणीसह आजच्या ट्रेडिंग सत्रात व्यवहार करत आहेत.
Join Our WhatsApp Community