जामियात शिकणाऱ्या Badar Khan ला हमासशी संबंध असल्याच्या आरोपामुळे अमेरिकेत अटक; व्हिसाही केला रद्द

44
जामियात शिकणाऱ्या Badar Khan ला हमासशी संबंध असल्याच्या आरोपामुळे अमेरिकेत अटक; व्हिसाही केला रद्द
जामियात शिकणाऱ्या Badar Khan ला हमासशी संबंध असल्याच्या आरोपामुळे अमेरिकेत अटक; व्हिसाही केला रद्द

अमेरिकेत (America) शिक्षण घेणारा भारतीय विद्यार्थी बद्र खान सूरी (Badar Khan) यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. त्याच्यावर इस्लामिक दहशतवादी संघटना हमासशी (Hamas) संबंधित असल्याचा आरोप आहे. बद्र खानला अटकही करण्यात आली आहे. आता ट्रम्प सरकार (trump government) त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई करण्याची तयारी करत आहे. दरम्यान, त्याचे वकील त्याचा बचाव करण्यात व्यस्त आहेत.

( हेही वाचा : ‘ट्रेड सर्टिफिकेट’ न केलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवा; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांचे आदेश

वृत्त संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरीला दि. १७ मार्च रोजी व्हर्जिनिया राज्यात ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला सध्या एका डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. सरकारने बद्र खानचा अमेरिकेचा (America) व्हिसाही रद्द केला आहे. बद्र खानने (Badar Khan) स्वत:ची सुटका करण्यासाठी सरकारकडे याचिकाही दाखल केली आहे. परंतु ट्रम्प प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच एका विशेष कायद्याचा वापर करून खानच्या हद्दपारीचा आदेश जारी केला आहे.

बद्र खान सूरी (Badar Khan) हा अमेरिकेतील (America) जॉर्जटाऊन विद्यापीठात (Georgetown University) संशोधक म्हणून काम करत आहे. तसेच तिथे अध्यापक म्हणूनही तो काम करतोय. त्याचे एका अमेरिकन महिलेशी लग्न झाले आहे. तो येथील अल वालिद बिन तलाल मुस्लिम-ख्रिश्चन केंद्रात संशोधन अभ्यासक म्हणूनही कार्यरत आहे. अमेरिकेतील व्हिसा, पासपोर्ट आणि अंतर्गत सुरक्षेची काळजी घेणाऱ्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) बद्र खानविरुद्ध (Badar Khan) कारवाई सुरू केली आहे.

डीएचएसने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “बद्र खान सुरी (Badar Khan) हा जॉर्जटाऊन विद्यापीठात विद्यार्थी होता. जो हमासचा (Hamas) प्रचार करत होता आणि सोशल मीडियावर यहूदीविरोधी भावनांना प्रोत्साहन देत होता. सुरीचे हमासच्या एका दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आढळले. तसेच तो दहशतवादी हमासचा सल्लागार असल्याचीही माहिती आहे.”

” दि. १५ मार्च २०२५ रोजी परराष्ट्र सचिवांनी असा निर्णय जारी केला की, सुरीच्या अमेरिकेतील कृतींमुळे त्याला आयएनए कलम २३७(अ)(४) अंतर्गत हद्दपारीची शिक्षा होऊ शकते,” असे डीएचएसने म्हटले आहे. जॉर्जटाऊन विद्यापीठानेही बद्र खान सुरी (Badar Khan) यांच्याबाबत एक निवेदन जारी केले आहे. सुरी यांच्यावरील आरोपांची त्यांना माहिती नसल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

सुरीबद्दल अधिक माहिती समोर आली आहे. तो २०२० पर्यंत दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात शिकत असल्याचे उघड झाले आहे. हमासला पाठिंबा दिल्यामुळे अमेरिकेने कारवाईला सामोरे जाणारा सुरी हा दुसरा भारतीय विद्यार्थी आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन (Ranjani Srinivasan) हिच्यावरही असाच आरोप झाला होता. मात्र तिला अटक करण्यात आली नाही. परंतु या आरोपानंतर रंजनी श्रीनिवासन (Ranjani Srinivasan) स्वतः अमेरिका सोडून गेली होती.

रंजनी श्रीनिवासन (Ranjani Srinivasan) कोलंबिया विद्यापीठात शहरी नियोजन विषयात डॉक्टरेटची विद्यार्थिनी म्हणून F-1 विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत गेली होती. तिचे काही निबंध प्रकाशित झाले ज्यात ती ब्राह्मणवादाला शिव्या देत होती. अमेरिकेत जाण्यापूर्वी रंजनी श्रीवास्तव यांनी अहमदाबाद, भारतातील सीईपीटी विद्यापीठात शिक्षण घेतले होते. (Badar Khan)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.