रशिया-युक्रेनमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा ही मोहीम सुरू केली आहे. युक्रेनमधील सद्य परिस्थिती आणखी बिकट झाल्यामुळे भारतीय दूतावासाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत तातडीने किव शहर आजच्या आज सोडावे असे आदेश भारतीय दूतावासाने दिले आहेत.
( हेही वाचा : रशियाने ‘हा’ टाकला बाॅम्ब ज्यामुळे हवेतील ऑक्सिजन झाला गायब! )
सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका
भारतीय दूतावासाने दिलेल्या या आदेशावरून आपण तेथील परिस्थितीचा अंदाज बांधू शकतो. रशियन सैन्य आता अधिक तीव्रतेने राजधानी कीवच्या दिशेने वाटचाल करत आहे. कीवमध्ये ठिकठिकाणी हवाई हल्ले होत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर किव शहर सोडा अशा सूचना भारतीय दूतावासाने दिल्या आहेत.
Advisory to Indians in Kyiv
All Indian nationals including students are advised to leave Kyiv urgently today. Preferably by available trains or through any other means available.
— India in Ukraine (@IndiainUkraine) March 1, 2022
‘ऑपरेशन गंगा’
मुंबई विमानतळावर आज सकाळी 7 वाजता एअर इंडियाचे विशेष विमान दाखल झाले. या विमानाने हेन्री कोनाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुकारेस्टवरुन काल रात्री 11.10 वाजता मुंबईसाठी उड्डाण केले होते. ‘ऑपरेशन गंगा’ या विशेष मोहिमेअंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणणारे हे सातवे विमान होते. एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाईसजेट या विमान कंपन्या ऑपरेशन गंगा मोहिमेत झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमधून दिल्ली आणि मुंबईकडे आणण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community