-
ऋजुता लुकतुके
टी दिलिप हे भारताचे सध्याचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या कारकीर्दीत भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण लक्षणीयरित्या सुधारलं. त्यामुळे बीसीसीआयने गौतम गंभीर यांना त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षक निवडण्याची संधी दिली तरी एका गोष्टीवर बासीसीआय ठाम होतं. क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी दिलीपच राहतील. अलीकडे एका सोशल मीडिया पोस्टवर दिलीप यांनीच आपल्या यशाचं गमक सांगितलं आहे. क्षेत्ररक्षणाने खेळाडूही एकत्र आले आणि संघात स्पर्धा निर्माण झाली, याविषयी ते सविस्तर बोलले. (Indian Team Fielding)
(हेही वाचा- Harmanpreet Kaur : टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघ गिरवतोय मानसिक कणखरतेचे धडे )
बीसीसीआयने अलीकडेच एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाचा सराव दाखवण्यात आला आहे. ‘उद्देश क्षेत्ररक्षणातील चुका टाळण्याचा होता. त्यासाठी आम्ही संघातील खेळाडूंमध्ये स्पर्धा निर्माण केली. त्यासाठीच सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देण्याची पद्धत सुरू झाली. अलीकडे आम्ही एक नवीन पद्धत सुरू केली आहे. सरावा दरम्यान दोन गट पाडण्यात येतात. प्रत्येक व्यायाम प्रकारात कमीत कमी चुका करणारा संघ जिंकतो. यामुळे सगळे खेळाडू सरावा दरम्यान लक्षपूर्वक सराव करतात,’ असं दिलीप या व्हीडिओत म्हणतात. (Indian Team Fielding)
Intensity 🔛 point 😎🏃♂️
Fielding Coach T Dilip sums up #TeamIndia‘s competitive fielding drill 👌👌 – By @RajalArora #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/eKZEzDhj9A
— BCCI (@BCCI) September 16, 2024
फक्त इतकंच नाही तर कसोटीत दोन प्रकारच्या झेलांचा सराव लागतो. फलंदाजांच्या जवळ उभे राहून क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू आणि ३० यार्डाच्या वर्तुळाजवळ तसंच सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू. साधारणपणे सीमारेषेवर आणि ३० यार्डाच्या वर्तुळावर उभे राहणारे फलंदाज हे गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडू असतात. त्यांचंही विशेष सराव सत्र भारतीय संघात होतं. इथंही खेळाडूंचे दोन स्वतंत्र गट पाडण्यात येतात. (Indian Team Fielding)
(हेही वाचा- Babar vs Virat Kohli : पाकिस्तानातील चॅम्पियन्स वन डे चषक स्पर्धेत झळकली विराट कोहलीची जर्सी)
भारतीय संघ आता आगामी हंगामात १० कसोटी सामने खेळणार आहे. यातील ५ कसोटी मायदेशात आणि उर्वरित ५ कसोटी ऑस्ट्रेलियात होणार आहेत. हंगामाच्या शेवटी पुढील वर्षी जूनमध्ये आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. आणि त्यासाठी पात्र ठरणं हे भारतासमोरचं पहिलं आव्हान आहे. (Indian Team Fielding)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community