Indian Telegraph Act : एकावेळी ९ सिमकार्ड वापरायला परवानगी; पण अवैध सिमसाठी ५० लाखांचा दंड

Indian Telegraph Act : २६ जूनपासून देशात नवीन दूरसंचार कायदा लागूही झाला आहे.

152
Indian Telegraph Act : एकावेळी ९ सिमकार्ड वापरायला परवानगी; पण अवैध सिमसाठी ५० लाखांचा दंड
  • ऋजुता लुकतुके

आता तुम्ही जास्तीत जास्त ९ सिम कार्ड घेऊ शकाल. त्याच वेळी, फसव्या मार्गाने सिम मिळविल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. केंद्र सरकारने २६ जून २०२४ पासून देशभरात नवीन ‘दूरसंचार कायदा २०२३’ लागू केला आहे. (Indian Telegraph Act)

हा कायदा सरकारला राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही दूरसंचार सेवा किंवा नेटवर्क ताब्यात घेण्याची, व्यवस्थापित करण्यास किंवा निलंबित करण्याची परवानगी देतो. युद्धसदृश परिस्थितीत गरज भासल्यास सरकार दूरसंचार नेटवर्कवरील संदेश रोखू शकेल. (Indian Telegraph Act)

नवीन नियमानुसार, भारतातील कोणत्याही व्यक्तीला आता ९ पेक्षा जास्त सिम कार्ड मिळू शकणार नाहीत. त्याच वेळी, जम्मू काश्मीर आणि ईशान्य राज्यांतील लोक जास्तीत जास्त ६ सिम कार्ड घेऊ शकतील. यापेक्षा जास्त सिम खरेदी केल्यास पहिल्यांदा ५०,००० रुपये आणि त्यानंतर प्रत्येक वेळी २ लाख रुपये दंडाची तरतूद आहे. (Indian Telegraph Act)

(हेही वाचा – State Govt : विमा भरण्यासाठी आगाऊ पैसे मागणाऱ्यांसाठी शासनाने केली ‘ही’ तरतूद)

नवीन दूरसंचार कायद्याबद्दल ८ महत्त्वाच्या गोष्टी

  • भारतीय जास्तीत जास्त ९ सिम कार्ड घेऊ शकतील
  • ९ पेक्षा जास्त सिम खरेदी केल्यास ५०,००० ते २ लाखांपर्यंतचा दंड
  • बनावट सीम घेतल्यास ५० लाख दंड/३ वर्षांचा तुरुंगवास
  • आणीबाणीच्या काळात सरकार नेटवर्क किंवा दूरसंचार सेवा खंडीत करू शकते.
  • आणीबाणीच्या काळात तुम्हाला हवे तिथे संदेश पसरवणे थांबवू शकते
  • प्रचारात्मक संदेश पाठवण्यापूर्वी ग्राहकाची संमती घेणे आवश्यक आहे.
  • सर्व जुने दूरसंचार कायदे रद्द केले जातील
  • दूरसंचार परवाना देणे सोपे होईल. (Indian Telegraph Act)

वस्तू आणि सेवांसाठी जाहिराती आणि प्रचारात्मक संदेश पाठवण्यापूर्वी ग्राहकांची संमती घेणे आवश्यक आहे, असेही बंधनकारक करण्यात आले आहे. यात असेही म्हटले आहे की दूरसंचार सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीला एक ऑनलाइन यंत्रणा तयार करावी लागेल, जेणेकरून वापरकर्ते त्यांच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवू शकतील. (Indian Telegraph Act)

दूरसंचार विधेयक गेल्या वर्षी २० डिसेंबरला लोकसभेत आणि २१ डिसेंबरला राज्यसभेत मंजूर झाले. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले. या कायद्यात एकूण ६२ कलमे असून त्यापैकी केवळ ३९ कलमांची अंमलबजावणी सुरू आहे. (Indian Telegraph Act)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.