Canada : परदेशात नोकरीसाठी जाताय तर थांबा! कॅनडात वेटरच्या नोकरीसाठी भारतीय तरुण आहेत रांगेत, व्हिडीओ व्हायरल

91
Canada : परदेशात नोकरीसाठी जाताय तर थांबा! कॅनडात वेटरच्या नोकरीसाठी भारतीय तरुण आहेत रांगेत, व्हिडीओ व्हायरल
Canada : परदेशात नोकरीसाठी जाताय तर थांबा! कॅनडात वेटरच्या नोकरीसाठी भारतीय तरुण आहेत रांगेत, व्हिडीओ व्हायरल

प्रत्येकजण आपल्या आयुष्यात चांगला पगार, चांगले घर आणि सुंदर जोडीदार शोधत असतो. या तीन गोष्टी मिळाल्यानंतर माणसाला इतर कशाचीही गरज भासत नाही. चांगल्या जीवनशैलीच्या शोधात लोक अनेकदा देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होतात. भारतातूनही बरेच लोक चांगल्या पगाराच्या आशेने कॅनडा (Canada) आणि इतर युरोपीय देशांमध्ये स्थायिक होतात. पण प्रत्येक वेळी गोष्टी आपल्याला वाटतात तशा घडत नाहीत.

(हेही वाचा-NIA ची मोठी कारवाई! देशातील पाच राज्यात २६ ठिकाणी छापेमारी)

अशीच काही भीषण वास्तव सांगणारी घटना कॅनडातून (Canada) समोर आली आहे. कॅनडामध्ये (Canada) एका रेस्टॉरंटमध्ये वेटरच्या नोकरीसाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. दोन दिवसांत 3000 हून अधिक लोकांनी या नोकरीसाठी अर्ज केला. विशेष म्हणजे, यातील बहुतांश लोक हे भारतीय आहेत. कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे असलेल्या ‘तंदूरी फ्लेम’ (Tandoori Flame) या रेस्टॉरंटने वेटर आणि सर्व्हेंटच्या पदासाठी नोकरीची जाहिरात दिली होती. यानंतर या नोकरीसाठी अनेकांनी अर्ज केले.

मुलाखतीसाठी आलेले बहुतांश लोक हे भारतीय होते. या पदासाठी अवघ्या दोन दिवसांत 3000 उमेदवार आले. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या परमीटमध्ये 35 टक्के कपात कॅनडा हे भारतीयांचे आवडते ठिकाण आहे. तिथे स्टुडंट व्हिसाच्या माध्यमातून वर्क परमिट, कायमस्वरूपी वास्तव्य आणि नंतर नागरिकत्व मिळवणे अगदी सोपे झाले आहे. मात्र, येत्या काळात भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडाला जाण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे. कारण कॅनडाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा 35 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. (Canada)

व्हिडिओमध्ये, आगमवीर सिंग नावाच्या रांगेत थांबलेल्या एका विद्यार्थ्याने म्हटले, “मी दुपारी आलो, आणि रांग मोठी होती. मी ऑनलाइन अर्ज केला आणि मुलाखत होईल असे सांगण्यात आले, पण काहीही झाले नाही. लोक फक्त इथे उभे आहेत. इथे नोकरीला वाव आहे असे मला वाटत नाही, ते कठीण आहे.” (Canada)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.