कोकण, सिंधुदुर्ग, देश-विदेश…अशा विविध ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतीयांना आता लवकरच अंतराळातही पर्यटनाची सेवा उपलब्ध होणार आहे. आपल्या ग्राहकांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) घेऊन जाणारी ही जगातील एकमेव कंपनी आहे.
अमेरिकेतील SpaceVIP ही कंपनी पुढील महिन्यात भारतात पदार्पण करणार असून ‘लक्झरी स्पेस अॅडव्हेंचर’ (Luxury space adventure) ही सेवा सुरू करणार आहे. या कंपनीचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. ही कंपनी अंतराळातील विलक्षण प्रवास अनुभव आणि इव्हेंटसाठी ओळखली जाते. या कंपनीमार्फत भारतीय ग्राहक मंगळ, चंद्र आणि आंशिक गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेऊ शकतील.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : ‘ऑपरेशन विजय’ मधील शहीदांचा पराक्रम ऊर्जा आणि प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
चंद्रयान – ३ च्या यशानंतर भारतीयांच्या अंतराळासंदर्भातील कुतूहलात लक्षणीय वाढ झाली आहे. अवकाश पर्यटनाचा वाढता कल पाहता कंपनी आता भारतात ही सेवा सुरू करणार आहे. ग्राहकांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर घेऊन जाण्याचीही कंपनीची योजना आहे. ‘पहिल्यांदाच या लक्झरी सेवा भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध असतील’, असे कंपनीने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही पहा –