Indians Deportation from US : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणखी ४८७ भारतीय नागरिकांना अमेरिका करणार हद्दपार

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अमेरिकन प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले आहे की, माघारी पाठवत असलेल्या भारतीयांशी कोणतेही अमानुष वर्तन सहन केले जाणार नाही.

34

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. त्यानुसार अमेरिकेने बुधवारी अमेरिकेत बेकायेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीय नागरिाकांना मायदेशी पाठवले होते. आता अशा पद्धतीने अमेरिकेत राहणाऱ्या आणखी ४८७ भारतीयांना माघारी पाठवणार (Indians Deportation from US) आहेत.

याबाबत केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत या प्रकरणावर बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, अमेरिकेने केंद्र सरकारला त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ४८७ भारतीय नागरिकांची माहिती दिली असून, त्यांच्या हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, अमेरिकेने भारताला ४८७ संभाव्य भारतीय नागरिकांबद्दल माहिती दिली आहे, ज्यांना हद्दपार (Indians Deportation from US) करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

(हेही वाचा Mahakumbh तील चेंगराचेंगरीप्रकरणी 10 हजार संशयित एटीएसच्या रडारवर; कट कारस्थान होते का? तपासाची दिशा निश्चित)  

सचिव विक्रम मिस्री यांनी अमेरिकन प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले आहे की, माघारी पाठवत असलेल्या भारतीयांशी कोणतेही अमानुष वर्तन सहन केले जाणार नाही. जर आम्हाला कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाची माहिती मिळाली तर, आम्ही वरिष्ठ पातळीवर हा मुद्दा उपस्थित करू. भारतीय स्थलांतरितांना बेड्या घालून हद्दपार केल्याच्या भूतकाळातील घटनांबद्दल विचारले असता, मिस्री म्हणाले की २०१२ मध्ये सरकारने अशा प्रकरणांचा निषेध केल्याची कोणतीही नोंद नाही. तथापि, त्यांनी पुन्हा सांगितले की भारताने आता अमेरिकेकडे आपली नाराजी नोंदवली आहे. (Indians Deportation from US)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.