भारतीयांचा चीनला 50 हजार कोटींचा फटका; स्वदेशी वस्तू खरेदीला प्राधान्य

178

यंदाच्या दिवाळी हंगामासाठी स्वदेशी वस्तूंच्या खेरदी विक्रीस प्राधान्य देऊन भारतीय व्यावसायिकांनी चीनला 50 हजार कोटींचा झटका दिला असल्याचे, काॅन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (काईट) म्हटले आहे. दिवाळी हंगामात 125 लाख कोटींचा व्यवसाय होईल, अशी शक्यताही व्यक्त केली. काईटचे अध्यक्ष बी.सी. भारतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवार म्हणाले की, यंदा दिवाळी हंगामात चांगला व्यवसाय होईल.

स्वदेशीला प्राधान्य दिल्यामुळे चीनला 50 हजार कोटींचा फटका बसला आहे. गेल्या वर्षी चीनने भारतात सुमारे 50 हजार कोटींचे साहित्य विकले होते. खंडेलवाल यांनी सांगितले की, मागील काही वर्षांपासून काईटकडून भारतीय दिवाळी अभियान चालवले जात आहे. स्वदेशी वस्तू वापरण्याचा आग्रह त्यात धरला जातो. त्याला यंदा यश मिळताना दिसत आहे.

( हेही वाचा: फडणवीस- पटोले यांची भंडा-यात भेट; बंद दाराआड काय झाली चर्चा? )

कोणत्या वस्तूंची मागणी वाढली?

खंडेलवाल म्हणाले की, यंदा किरकोळ विक्री क्षेत्रात विभिन्न वस्तूंच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. यात एफएमजीसी उत्पादने, ग्राहकोपयोगी वस्तू, खेळणी, विजेची उपकरणे, किचनमधील उपकरणे, भेटवस्तू, मिठाई फरसाण, घरगुती सामान, टॅपेस्ट्री, भांडी, सोने व आभूषणे, पायताण, घड्याळे, फर्निचर, फिक्सचर, वस्त्रे व दिवाळीच्या पूजेचे अन्य साहित्य, भिंतीची लटकणे, हस्तकला वस्तू, दारावर लावण्यात येणारे शुभ-लाभ, ओम आणि लक्ष्मीची पावले इत्यादी वस्तूंचा त्यात समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.