बापरे! कोरोनाविषयी दिशाभूल करण्यात भारतीय जगभरात अव्वल!

जगभरात भारतात अशा प्रकारची माहिती पसरवण्यात आली, हे प्रमाण १८.०७ इतके होते.

90

कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून त्याच्याविषयी फारशी माहिती नसतांनाही भारतात मात्र त्याच्या लक्षणांना पासून उपचारपद्धती सांगत सोशल मीडियावर अनेकांनी ‘हुशारी’ दाखवली होती. त्यातून समज कमी आणि गैरसमजच जास्त पसरले होते, अशा प्रकारे या महामारीविषयी गैरसमज पसरवण्यात भारतीयांनी जगात अव्वल क्रमांत पटकावला आहे. तसा अहवाल जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाला आहे. ‘प्रिव्हॅलन्स अँड सोशल अ‍ॅनॅलिसिस ऑफ कोविड १९ मिसइनफॉर्मेशन इन १३८ कंट्रीज’ हा अहवाल ‘सेज’ च्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन अँड इन्स्टिट्यूशन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

काय आहे कारण? 

जगातील १३८ देशातील ९,६५७ इतक्या माहितीच्या संचांचा यात अभ्यास करण्यात आला. त्याची ९४ संस्थांनी सत्यता पडताळली. त्यानंतर प्रसारित झालेली माहिती ही दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाले. जगभरात भारतात अशा प्रकारची माहिती पसरवण्यात आली, हे प्रमाण १८.०७ इतके होते. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारतात सध्या इंटरनेट सुविधा गावखेड्यात पोहचली आहे. त्यामुळे लोक समाजमाध्यमांचा जास्त वापर करत आहेत. तसेच इंटरनेट साक्षरतेचा अभावही बराच आहे. कोरोनाबाबत दिशाभूल करणाऱ्याला माहितीला कुणीही बळी पडू नये. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. समाजमाध्यमातून येणाऱ्या माहितीची तपासणी करणे गरजेचे आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. माहितीचा स्रोत काय आहे यावर माहितीची विश्वासार्हता अवलंबून असते, त्यामुळे स्रोत तपासणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाबाबत दिशाभूल करणाऱ्या महिला बाली पडणाऱ्यांमध्ये भारत १५.९४ टक्के जणांचा समावेश आहे, अमेरिका ९.७४ टक्के, ब्राझील ८.५७ टक्के, स्पेन ८.०३ टक्के अशा क्रमानुसार आघाडीवर आहे.

(हेही वाचा : बलात्कारानंतर हत्या : देशभरातील १० टक्के घटना घडल्या महाराष्ट्रात!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.