भारतात लवकरच धावणारी हायड्रोजन ट्रेन आहे तरी काय?

197

युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेल्या कालका-शिमला रेल्वे मार्गावर हायड्रोजन ट्रेन चालवण्यात येणार आहे. यासाठी कालका, शिमला आणि बरोग स्थानके ही हायड्रोजन इंधन स्टेशन म्हणून विकसित केली जाणार आहेत. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन चालवण्यासाठी या स्थानकांची निवड करण्यात आली आहे. पाण्यातून हायड्रोजन काढून त्याचे इंधनात रूपांतर करण्यासाठी या स्थानकांवर प्लांट उभारण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत कालका-शिमला मार्गावर हायड्रोजन ट्रेन चालवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भारतीय रेल्वेने आपल्या हेरिटेज मार्गांवर हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पाच्या वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या ट्रेनची घोषणा केली.

पाण्यापासून इंधनाची निर्मिती 

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी कालका-शिमला रेल्वे विभागाचे सर्वेक्षणही केले आहे. सध्या या रेल्वे विभागात डिझेल लोकोमोटिव्ह कार्यरत आहेत. हायड्रोजन हे प्रदूषणविरहित स्वच्छ इंधन मानले जाते. हायड्रोजन इंधनाच्या वापरामुळे हानिकारक वायूंचे शून्य उत्सर्जन होते आणि फक्त पाण्याची वाफ होते, जी हवेसाठी पर्यावरणास अनुकूल मानली जाते. पहिल्या टप्प्यात हायड्रोजन ट्रेन फक्त नॅरोगेज ट्रॅकवर चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हरित इंधनावर आधारित रेल्वे गाड्या पुरवण्यासाठी डिझेल लोकोमोटिव्ह इंजिनचे हायड्रोजन इंजिनमध्ये रूपांतर करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या चालवण्याची योजना आहे.

(हेही वाचा ५ फेब्रुवारीच्या हिंदू जन आक्रोश मोर्च्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; शुक्रवारी निर्णय)

विशेष ट्रेन चेन्नईहून कालका येथे पोहोचली, चाचणीला परवानगी

ही  विशेष ट्रेन चेन्नईहून कालका येथे पोहोचली आहे. अंबाला रेल्वे विभागाला कालका-शिमला दरम्यान ट्रेन सेटची (इंजिनशिवाय तीन डबे असलेली हायस्पीड ट्रेन) चाचणी घेण्यास रेल्वे बोर्डाकडून परवानगी मिळाली आहे. आरडीएसओ (रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन) टीम या महिन्यात रेल्वे सेटची चाचणी सुरू करेल.

काय आहेत हायड्रोजन ट्रेनची वैशिष्ट्ये? 

  • डिसेंबर २०२३ पर्यंत भारतात प्रथमच धावणार
  • ही ट्रेन पूर्णतः भारतात बनवण्यात आली
  • हायड्रोजन इंधनावर ही ट्रेन चालणार
  • हायड्रोजन इंधनामुळे प्रदूषण नाही, आवाजही कमी – १४० प्रति तास वेगाने धावणार, १ हजार किमी पर्यंतचे अंतर कापणार
  • इलेक्ट्रिक ट्रेनच्या तुलनेत ही ट्रेन १० पट वेगात धावणार
  • २० मिनिटात या ट्रेनमध्ये इंधन भरता येते, त्यानंतर सलग १८८ तास धावते
  • या ट्रेनसाठी लागणारे इंधन आणि तिचा देखभाल खर्च कमी
  • सुरुवातीला ८ विविध मार्गावरून ट्रेन चालवणार, पहिली ट्रेन कालका-शिमला मार्गावरून धावणार
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.