भारत 2027 मध्ये चंद्रावरील खडकांचे नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी ‘चांद्रयान-4’ (Chandrayaan-4) ही मोहिम प्रक्षेपित करेल. अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी एका मुलाखतीत दिली.
( हेही वाचा : ST Corporation President : आता प्रताप सरनाईक नाही तर ‘हे’ असतील एसटी महामंडळाचे अध्यक्ष)
यासंदर्भात जितेंद्र सिंह (Jitendra Singh) म्हणाले की, भारत 2026 मध्ये खोल समुद्राचा शोध घेण्यासाठी ‘समुद्रयान’ (Samudrayaan) मोहिम देखील प्रक्षेपित करेल आणि ‘गगनयान’ (Gaganyaan) ही मोहीम देखील भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या तुकडीसह अवकाशात झेपावेल. चांद्रयान-4 मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आहे. यामध्ये हेवी-लिफ्ट एलव्हीएम-3 रॉकेटचे किमान 2 वेगवेगळे प्रक्षेपण समाविष्ट असतील.
जे मोहिमेचे 5 वेगवेगळे घटक वाहून नेतील जे कक्षेत एकत्र केले जातील. तसेच गगनयान मोहिमेत (Gaganyaan mission) भारतीय अंतराळवीरांनी विशेषतः डिझाइन केलेल्या अंतराळयानातून पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे समाविष्ट आहे, पुढील वर्षी ही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. भारत 2026 मध्ये समुद्रयान देखील प्रक्षेपित करेल, ज्यामध्ये 3 शास्त्रज्ञांना खोल समुद्रात 6 हजार मीटर खोलीपर्यंतच्या पाणबुडीतून समुद्रतळाचा शोध घेण्यासाठी नेले जाईल. ही कामगिरी गगनयान अंतराळ मोहिमेसह भारताच्या इतर महत्त्वाच्या मोहिमांच्या वेळेनुसार होईल, जी देशाच्या वैज्ञानिक उत्कृष्टतेच्या प्रवासात एक सुखद योगायोग ठरेल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community