- ऋजुता लुकतुके
२०२३ मध्ये ऑनलाईन फूड ऑर्डरमध्ये बिर्याणीच अव्वल ठरली. तर एका मुंबईकराने तब्बल ४३ लाखांची ऑर्डर स्विगीला (Swiggy) दिली. (India’s Favourite Food)
बिर्याणी हा भारतातील एक लोकप्रिय पदार्थ आहेच. आता ऑनलाईन ऑर्डरवरून ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. २०२३ मध्ये लोकांचा पदार्थ ऑर्डर करण्याचा ट्रेंड नेमका कसा होता, याचा एक अहवाल ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप स्विगीने नुकताच जाहीर केला आहे आणि यात बिर्याणीच नंबर वन ठरली आहे. (India’s Favourite Food)
(हेही वाचा – INS Imphal : आयएनएस इम्फाळ नौदलात होणार दाखल; ब्राम्होस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज)
‘ग्राहकांनी स्विगीवर (Swiggy) अन्नपदार्थ मागितले असतील किंवा सर्च केले असतील अशी दुहेरी आकडेवारी या अहवालात आहे आणि ती पाहता दर एका सेकंदाला भारतीयांना बिर्याणीच्या २.५ ऑर्डर दिल्या आणि ५.५ मांसाहारी बिर्याणीनंतर एक ऑर्डर ही शाकाहारी होती,’ असं स्विगीच्या अहवालात म्हटलं आहे. स्विगीला सर्वाधिक ऑर्डर चेन्नई, दिल्ली आणि हैद्राबाद या शहरातून मिळाल्या. या सगळ्या ऑर्डर १०,००० च्या वर होत्या. (India’s Favourite Food)
एका दिवसांत सर्वाधिक मागणी असलेला पदार्थ होता पिझ्झा. भुवनेश्वर मध्ये एकाच दिवसी पिझ्झाच्या २०७ ऑर्डर होत्या. तर एका शहरातून सर्वाधिक ऑर्डर आल्या त्या झांशीमधून. एकाच दिवशी इथं २६९ ऑर्डर होत्या. स्विगीवर (Swiggy) सगळ्यात जास्त गोड पदार्थ मागवला गेला तो गुलाबजामुन. खासकरून नवरात्रीच्या काळात नेहमीच्या रसगुल्ल्याऐवजी यंदा गुलाबजामुनला मागणी होती. तर शाकाहारी ऑर्डरमध्ये सर्वाधिक मागणी होती ती मसाला डोशाला. (India’s Favourite Food)
(हेही वाचा – Manoj Jarange Patil : इथे अजित पवार तोंड का उघडत नाहीत? जरांगे पाटील यांची टीका)
बंगळुरू शहराला स्विगीने (Swiggy) ‘केक कॅपिटल’ असं नाव दिलं आहे. कारण, वर्षभरात या शहरातून ७७ लाख केकची ऑर्डर आली. तर व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) च्या काळात देशात एका मिनिटाला २७१ केक ऑर्डर होत होते. लोकांचा फेव्हरेट होता चॉकलेट केक. नागपूरमध्ये एका व्यक्तीने एका दिवसांत ९२ केक ऑर्डर केल्याचंही स्विगीने म्हटलं आहे. (India’s Favourite Food)
तर मुंबईतील एका ग्राहकाने वर्षभरात स्विगीवर ४२.३ लाख रुपयांच्या ऑर्डर दिल्या. नवीन वर्षात स्विगीने लोकांना आपल्या ॲपवर आणखी एक सुविधा देऊ केली आहे. आता ॲपवर तुमच्या आधी दिलेल्या सर्व ऑर्डर दिसू शकणार आहेत. (India’s Favourite Food)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community