वोल्वो ट्रक्स आणइ डेल्हीव्हरी लिमिटेड कंपनीने शनिवारी भारतातील पहिली रोड ट्रेन लाँच केली. नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूरमध्ये भारतातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. देशात 2020 मध्ये रोड ट्रेन संकल्पना अधिकृतपणे नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आली, ज्यामुळे 25.25 मीटर लांबीपर्यंतची वाहने चालविण्याची परवानगी मिळाली. यात एक ट्रॅक्टर युनिट असते जे दोन किंवा अधिक ट्रेलर ओढते, ज्यामुळे मालवाहतूक क्षमता वाढते.
(हेही वाचा – Arvind Kejriwal यांच्या अडचणीत वाढ; ‘शीशमहल’च्या भ्रष्टाचाराची होणार चौकशी)
वोल्वो ट्रक्सच्या रोड ट्रेनमध्ये उद्योगातील आघाडीचा वोल्वो एफएम 420 4×2 ट्रॅक्टर, 24 फूट कंटेनराइज्ड इंटरमीडिएट ट्रेलर आणि 44 फूट सेमी-ट्रेलर यांचा समावेश आहे, जो एकत्रितपणे 144 घनमीटर कार्गो वाहून नेतो. जो मानक सेमी-ट्रेलर्सपेक्षा 50 टक्क्यांहून जास्त आहे. अनेक प्रशिक्षण आणि चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, वोल्वो एफएम 420 4×2 रोड ट्रेनला नागपूर आणि भिवंडी ते दिल्ली या प्रत्येक केंद्रादरम्यान धावण्यासाठी एमओआरटीएच आणि एआरएआय कडून प्रमाणित करण्यात आले आहे. वोल्वो एफएम 420 4×2 रोड ट्रेनमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम (ईबीएस), स्थिरता नियंत्रण (ईएसपी), 360-डिग्री कॅमेरा, ट्रेलरवरील सेल्फ-स्टीअरिंग एक्सल, लोड मॉनिटर, डाउनहिल क्रूझ कंट्रोल आणि चांगल्या स्थिरतेसाठी स्ट्रेच ब्रेक अशी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
(हेही वाचा – New India Co-operative Bank न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटी रुपयांचा घोटाळा; महाव्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल)
याप्रसंगी व्हीई कमर्शियल व्हेइकल्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ विनोद अग्रवाल म्हणाले की, “वोल्वो एफएम 420 4×2 रोड ट्रेन ही भारतीय बाजारपेठेसाठी एक महत्त्वाची ऑफर आहे. रस्ते वाहतूक अधिक कार्यक्षम आणि परवडणारी बनवण्यासाठी ही गाडी डिझाइन करण्यात आली आहे आणि सरकारच्या गति शक्ती मास्टर प्लॅनशी सुसंगत आहे. या उपक्रमाबद्दल आम्ही नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे आभारी आहोत आणि भारतात आणखी जागतिक नवोपक्रम आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community