India’s Forex Reserve on High : भारताची परकीय गंगाजळी चार महिन्यांतील उच्चांकावर

भारताकडील परकीय चलनसाठा ६०४ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. 

187
India’s Forex Reserve on High : भारताची परकीय गंगाजळी चार महिन्यांतील उच्चांकावर
India’s Forex Reserve on High : भारताची परकीय गंगाजळी चार महिन्यांतील उच्चांकावर
  • ऋजुता लुकतुके

भारताकडील परकीय चलनसाठा ६०४ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचल्याचं रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) स्पष्ट केलं आहे. (India’s Forex Reserve on High)

सलग तिसऱ्या आठवड्यात भारतीय परकीय गंगाजळीत वाढ झाली आहे आणि परिणामी, सध्या भारतीय तिजोरीत ६०४ अब्ज अमेरिकन डॉलर जमा झाले असून गेल्या चार महिन्यांतील हा उच्चांक आहे. रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. (India’s Forex Reserve on High)

१ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात परकीय गंगाजळीत (Foreign reserves) ६.१ अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ झाली. त्या आधीच्या आठवड्यात ही वाढ ७.६ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत स्थिर रहावी यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत आंतरराष्ट्रीय बाँड्सची गरजेनुसार खरेदी विक्री करत असते. (India’s Forex Reserve on High)

त्यावरून भारतीय गंगाजळीचं मूल्य ठरतं. अलीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.२९५ ते ८३.३५० या दरम्यान स्थिर आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सलग दोन आठवडे खाली येत आहेत. त्यामुळेही रुपया स्थिर राहू शकला आहे आणि भारताला तेल खरेदी करण्यासाठी तुलनेनं कमी चलन वापरावं लागलं आहे. (India’s Forex Reserve on High)

(हेही वाचा – Single KYC For All Services : लवकरच सर्व प्रकारच्या आर्थिक सेवांसाठी एकच केवायसी चालणार)

वाणिज्य आणि औद्योगिकमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनीही अलीकडेच फिक्कीच्या वार्षिक संमेलनात भारतीय परकीय गंगाजळीबद्दल (Foreign reserves) समाधान व्यक्त केलं होतं. ‘भारतात पुरेसा चलन साठा आहे. रुपयाची किंमत स्थिर राखण्याची तसंच भारतीय अर्थव्यवस्थाही येती ५-६ वर्षं स्थिर राखण्याची क्षमता त्यामुळे आपल्याकडे आहे. चालू खात्यात किंवा व्यापारी खात्यात तूट आली तरी आपल्याला फारसा फरक पडणार नाही,’ असं ते यावेळी बोलताना म्हणाले होते. (India’s Forex Reserve on High)

तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनीही शुक्रवारी पतधोरण जाहीर करताना अर्थव्यवस्थेवर सकारात्मक भाष्य केलं. ‘जगभरात हवामान बदल, युद्धसदृश परिस्थिती यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम जाणवत असला तरी प्रगत देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे,’ असं शक्तिकांत दास (Shaktikanta Das) म्हणाले. (India’s Forex Reserve on High)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.