भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) गेल्या वर्षी चांद्रयान-३ ची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. त्यानंतर आता इस्त्रो मानवाला चंद्रावर पाठवण्याची तयारी करीत असल्याची माहिती इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली. (ISRO)
यावेळी एस. सोमनाथ (S. Somanath) म्हणाले की, चांद्रयान कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावर वेगाने काम सुरू आहे. आगामी २०४० मध्ये चंद्रावर एका मानवाला उतरवण्यासाठी चांद्रयान-४ ची योजना आखली जात आहे. चांद्रयान मालिकेला पुढे नेण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) घोषणा केली आहे की, २०४० मध्ये एक भारतीय व्यक्ती चंद्रावर उतरेल. यासाठी आपल्याला विविध मार्गांनी चंद्राचा शोध घेणे सुरुच ठेवावे लागेल. चांद्रयान-४ अंतराळयान चंद्रावर लँडिंग, नमुने गोळा करणे आणि भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. (ISRO)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : आचारसंहितेचे पालन करताना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’)
इस्रोकडे (ISRO) सध्या अनेक प्रकल्प आहेत. यामध्ये रॉकेट प्रकल्प, उपग्रह प्रकल्प, अनुप्रयोग प्रकल्प आणि तंत्रज्ञान विकास प्रकल्पांचा समावेश आहे. आमच्याकडे सुमारे ५-१० रॉकेट प्रकल्प, सुमारे ३०-४० उपग्रह प्रकल्प, १०० अनुप्रयोग प्रकल्प आणि हजारो संशोधन आणि विकास प्रकल्प आहेत. गेल्या वर्षी इस्रोने चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवले होते. अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरला. भारताचे सौर मिशन, आदित्य एल-१ देखील २०२४ च्या सुरुवातीला यशस्वी झाले. आता या वर्षी भारताची सर्वात महत्वाकांक्षी मोहीम ‘गगनयान’ आहे. या मोहिमेत भारत आपले अंतराळवीर तीन दिवसांसाठी अंतराळात पाठवणार आहे. हे अभियान पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार जुलैमध्ये पार पडेल असे त्यांनी सांगितले. (ISRO)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community